मुंबई : काही मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी घर करुन जातात. कोमत्याही वयोगटातील प्रेक्षकांना या मालिका आणि त्यातील कलाकारांची भुरळ पडते. अशीच एक मालिका काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैत्रीची एक वेगळी परिभाषा या मालिकेमुळं प्रेक्षकांना पाहता आली. मुख्य म्हणजे मालिकेमुळं काही तरुण कलाकारही मराठी कलाजगतत नावाजले गेले. ही मालिका म्हणजे 'दिल दोस्ती दुनियादारी'. 


Friendship अर्थात मैत्रीचं नातं अनोळखी असल्यापासून अगदी आयुष्यातील अविभाज्य भाग होईपर्यंत कसं फुलतं यावर मालिकेचं कथानक साकारलं गेलं. याच मालिकेत एक लहानशी भूमिका साकारली होती ती म्हणजे अभिनेत्री मंजिरी पुपालानं. 


मंजिरीच्या अभिनयानं सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकली. मुद्दा असा, की तिची भूमिका फार मोठी नसली तरीही तिन अभिनयाच्या बळावर मात्र सर्वांचीच मनं जिंकली. फक्त मराठीच नव्हे, तर हिंदी मालिकांमध्येही मंजिरी झळकली. (Dil Dosti Duniyadari fame Actress Manjiri Pupala shares bold photos)



रंगभूमीवर सक्रिय असणारी ही अभिनेत्री प्रत्यक्ष आयुष्यात बरीच बोल्ड. सोशल मीडियावर ती करत असणाऱ्या पोस्ट पाहून लगेचच याचा अंदाज येत आहे. मंजिरीनं सातत्यानं तिचे काही फोटोशूट्स इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. 





असेच काही नवे फोटो तिनं पुन्हा शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कुठे नजर रोखून दिसत आहे, तर कुठे मादक रुपानं घायाळ करत आहे. मंजिरीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटोंमध्ये तिच्या स्वभावाचे गुणविशेषही अगदी सहजपणे झशकताना दिसत आहेत. 


प्रकाशझोतात असणाऱ्या कलाकारांइतकी मंजिरी चर्चेत नसली, तरी तिच्या फॉलोअर्ससाठी मात्र ती सतत नवे स्टाईल स्टेटमेंट देताना दिसते.