मुंबई : 'स्वॅग से स्वागत' हे  टायगर जिंदा है चित्रपटातील पहिलं गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या गाण्यामध्ये तुम्ही सलमान खान आणि कॅटरिना कैफचा कूल अंदाज पाहिला असेल . सुमारे ५ वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ एकत्र आले. त्यांच्यामधील रोमान्टिक अंदाज पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर होते. 


दिल दिया गल्ला...  


सलमान - कॅटरिना मधील रोमॅन्टिक अंदाज पाहण्याचा चाहत्यांची इच्छा 'दिल दिया गल्ला... या गाण्यामध्ये पूर्ण झाली आहे. या गाण्यामध्ये झोया आणि टायगर यांच्यामधील केमेस्ट्री चाहत्यांच्या भेटीला आली आहे. 


 




दिल दिया गल्ला हे रोमॅन्टिक गाणं आतिफ असलम याने गायलं आहे. टायगर जिंदा है चित्रपटातील गाण्यांना विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलं आहे. 


टायगर जिंदा है चित्रपटाचा ट्रेलर, त्यापाठोपाठ आलेलं चित्रपटातील 'स्वॅग से स्वागत' हे गाणं सुपर हीट ठरल्यानंतर 'दिल दिया गल्ला' हे गाणंदेखील चाहत्यांसाठी ट्रिट ठरणार आहे. 


टायगर जिंदा है चित्रपटा २२ डिसेंबरला रसिकांंच्या भेटीला येणार आहे.