Dilip Joshi on Salmaan Khan: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) मालिकेतील अभिनेते दिलीप जोशी हे लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांच्या अभिनयाचे सर्वच जण चाहते आहेत. त्यातून गेली 14 वर्षे सलग ते जेठालाल म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. त्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. आता अभिनेते दिलीप जोशी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी सलमान खानबद्दल वक्तव्य केलं आहे. सलमान खानचा 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी अभिनेते दिलीप जोशी आणि अभिनेता सलमान खान हे दोघं जण एकत्र एक रूम शेअर करत होते. याबद्दल खुद्द दिलीप जोशी यांनी खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच राजश्री प्रोडक्शनला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे. यावेळी दिलीप जोशी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी यावेळी माधूरी दीक्षित आणि सलमान खानच्या फिल्म शुटिंगच्या वेळेस किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, मी माधुरीचा खूप (Salmaan Khan) मोठा फॅन आहे. मी त्यांच्यासोबत काम करण्यास खूपच उत्सुक होतो. शुटिंगचा पहिला दिवस होता जेव्हा सगळेच कॉल टाईमच्या आधी लवकर आले होते. माधुरीही लवकर आली होती. तो एक फॅन मुमेंट होता जेव्हा मी तिला किक्रेट कॉस्ट्यूममध्ये जिन्यावर उतरताना पाहिले होते. 


सलमान खानसोबत रूम शेअर केली तेव्हा... 


त्यांनी पुढे सांगितले की, ''फिल्मीस्तानमध्ये त्यांनी शुटिंग होते तेव्हा सलमान खानसोबत मी रूम शेअर केली होती. यावेळी सलमान खानविषयी बोलताना सांगितले की, सलमान खान अगदी कॉपरेटिव्ह होता त्यानं कुठल्याही प्रकारचे कधी नखरे केले नाही. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला राहिला आहे.''


हेही वाचा - Karan Johar 'या' अभिनेत्रीवर करायचा 'बेपनहा मोहोब्बत' पण...


सलमान खान हा आजच्या घडीचा बॉलिवूडमधला सर्वाधिक लोकप्रिय कलाकार आहे. तो त्याच्या अभिनयासाठी खूप लोकप्रिय आहे. त्यानं गेली 30 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. परंतु सर्वाधिक ओळखला गेला ते म्हणजे त्याच्या बिग बॉसच्या होस्टिंगसाठी. या रिएलिटी शोमुळे प्रसिद्ध झाला आहे. सलमान हा अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता. काही दिवसांपुर्वी त्यानं मदर्स डेच्या निमित्तानं एक फोटो शेअर केला होता. आपल्या आईसोबतच्या या हळव्या फोटोवर चाहत्यांचा कमेंट्सचा तूफान पाऊस पडला होता.