मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या तेरा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान तयार केलं आहे. या शोच्या प्रत्येक पात्राचा एक वेगळा फॅन फॉलॉईंग आहे. प्रेक्षकांना कधी जेठालाल यांची विनोदबुद्धी आवडते, तर कधी मित्रांसोबत सुरू असलेल्या थट्टा मस्करीमुळे जेठालाल चर्चेत असतात. पण चाहत्यांच्या मानत घर करण्यासाठी म्हणजे यशाच्या उच्च शिखरावर पोहोचण्यासाठी जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलीप जोशी यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. एका मालिकेत भूमिका साकारत असताना अचानक मालिका बंद झाली. त्यानंतर कित्येक दिवस त्यांच्या हातात काम नव्हतं. त्यामुळे त्यांनी यापुढे अभिनय न करण्याचा निर्णय घेतला. 



पण त्यांच्या नशीबाला काही वेगळचं मान्य नव्हतं. त्यानंतर दिलीप जोशी यांना 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेसाठी ऑफर आली आणि त्यांचं आयुष्य पूर्णपण बदललं. 


गोकुळधाम सोसायटीच्या कुटुंबांची कथा मालिकेत दाखवली आहे. जिथे प्रत्येक धर्म आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. दररोज गोळूळधाम रहिवाशांकडे एक नवीन समस्या येते, जी प्रत्येकजण मिळून सोडवतो. परंतु प्रकरण कितीही गंभीर असले तरी मालिका तुम्हाला हसवणं काही सोडत नाही.