फोटो : दिलीप कुमार - सायरा बानो यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन
बॉलिवूडचं बहुचर्चित जोडपं दिलीप कुमार आणि सायरा बानो... या जोडप्यानं आज आपल्या लग्नाला ५१ वर्ष पूर्ण केलेत. हा क्षण त्यांनी आपल्या राहत्या घरी सेलिब्रेट केला.
मुंबई : बॉलिवूडचं बहुचर्चित जोडपं दिलीप कुमार आणि सायरा बानो... या जोडप्यानं आज आपल्या लग्नाला ५१ वर्ष पूर्ण केलेत. हा क्षण त्यांनी आपल्या राहत्या घरी सेलिब्रेट केला.
या सेलिब्रेशनचे फोटो त्यांनी ट्विटरवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलेत. दिलीप कुमार यांच्या वतीनं पत्नी सायरा बानू यांनी 'आमच्या लग्नाच्या ५१ व्या वर्षानिमित्तानं आम्ही आमच्या कुटुंबीयांचे, मित्रांचे आणि फॅन्सचे आभार मानतो... दिलीप साहाब यांनी आपल्या ४८ पाली हिलमधील घरात याचा आनंद साजरा केला'... पाली हिलची ही प्रॉपर्टी दिलीप कुमार यांना कोर्टातल्या मोठ्या लढाईनंतर मिळालीय.
गेल्या काही महिन्यांपासून दिलीप कुमार यांची तब्येत ठिक नसते... परंतु, आजच्या फोटोंमध्ये ते पहिल्यापेक्षा ठणठणीत दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना डिहाड्रेशन आणि युरिनल इन्फेक्शनमुळे मुंबईच्या लीलावती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.