मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी 7.30 वाजता निधन झालंय. ते 98 वर्षाचे होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गेल्या महिन्यात त्यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं..पण आज बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने सगळ्यांचा निरोप घेतलाये. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडचं मोठं नुकसान झालंय. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत दिलीप  कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने 'खरा हिरो' असं ट्विट करत दिलीप कुमार यांच्या जाण्याने दु:ख झाल्याचं म्हटलंय.



अजय देवगणने दिलीप कुमार यांचासोबतचा फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलीये, नेहमीच ते स्मरणात राहतील असं ट्विटमध्ये म्हटलंय.



बॉलिवूड अभिनेता मनोज जोशी यांनी दिलीप कुमार यांचं एक सुंदर पेटींग शेअर केलंय.
 



भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेता अशी उपमा दिलीप कुमार यांना साऊथ स्टार चिरंजीवीने दिलीये.
 



कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांनी देखील भारतीय सिनेसृष्टीतील रियल हिरो गमावल्याचं म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सिनेसृष्टीसाठी हे मोठं  नुकसान असल्याचं म्हटलंय.सोबतच राहुल गांधी , ममता बॅनर्जी यांनी देखील दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


 




शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्या परिवाराला या दु:खातून स्वत:ला सावरण्याचं बळ मिळो, अशी प्रार्थाना करत श्रद्धांजली वाहिली आहे.