दिलीप कुमार आणि मधुबालाच्या प्रेम प्रकरणात वडील बनले खलनायक.... यानंतर
मधुबालाबरोबर दहा वर्षे टिकलेल्या नात्याला एका शपथेन एवढं दुरावलं की, दिलीप कुमार या ब्रेकअपनंतर पूर्णपणे तुटले
मुंबई : बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार दिलीप कुमारची प्रेमकथा अत्यंत मार्मिक आहे. मधुबालाबरोबर दहा वर्षे टिकलेल्या नात्याला एका शपथेन एवढं दुरावलं की, दिलीप कुमार या ब्रेकअपनंतर पूर्णपणे तुटले होते, दु: खामध्ये डुबलेल्या दिलीपने बॉलिवूड सोडलं आणि चित्रपटांना ब्रेक घेतला. त्या कठीण काळात शायरा बानोने दिलीप कुमारला संभाळलं
'ज्वार भट्टा' मधून करिअरमध्ये केलं पदार्पण
बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं खरं नाव युसुफ खान आहे. ब्रिटिश काळात त्यांचा जन्म झाला आणि फाळणीच्या वेळी, त्याच्या कुटुंबाने भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तारुण्यात आलेल्या युसूफ खानने चित्रपटांमध्ये जाण्याचे ठरवलं. 1944 मध्ये कारकिर्दीतील पहिला सिनेमा 'ज्वार भाटा' साइन केला. यावेळी, त्याचे नाव युसूफ खानऐवजी दिलीप कुमार असे करण्यात आलं. जे कायमच त्याचं फिल्मी नाव बनलं.
मधुबालासोबत अफेअर
1951मध्ये दीदार आणि तराना चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दिलीप कुमारने मधुबालाला भेटले. तेव्हापासून त्या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. हळूहळू प्रेम देखील वाढू लागलं, जे प्रेमाच्या शिखरावर पोहोचलं. मात्र हे नातं धाग्यात बांधण्यापूर्वीच अपयशी ठरलं. मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं प्रेम प्रकरण संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय झालं होतं. मधुबालाच्या वडील अताउल्ला खान यांनाही या दोघांच्य नात्याला काहीच हरकत नव्हती.
मधुबालाच्या वडिलांची अट नाकारली
दोघांमधील प्रेम जवळ-जवळ 10 वर्षे टिकलं आणि मग मधुबालाच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे या दोन जिवांना विभक्त होण्यास भाग पाडलं. मधुबालाचे वडील अताउल्ला खान एक चित्रपट निर्माता होते आणि त्यावेळीच दिलीप कुमारच्या सिक्का या सिनेमाचा इंडस्ट्रीचा बोलबाला होता. दिलीप कुमार यांच्यासमोर अताउल्ला खानने यांनी एक अट ठेवली की, दिलीप कुमार फक्त त्याच्या चित्रपटात काम करेल आणि कोणाबरोबरही काम करणार नाही तेव्हाच त्याने मधुबालाशी लग्न करावं.
सायरा बानोसोबत केलं लग्न
दिलीपच्या मधुबालावरील प्रेमामुळे सायरा दिलीपला कधीच मनातील भावना वक्त करु शकत नव्हती. पण जेव्हा दिलीप मधुबालाचं ब्रेकअप झालं तेव्हा तो पुर्णपणे तुटला होता. दिलीपला संभाळण्यासाठी सायरा बानोने हात पुढे केला. बरीच वर्षे चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर दिलीपकुमार पुन्हा सायराबरोबर उभे राहिले आणि चित्रपटांमध्ये परत आले. नंतर दिलीपकुमारने सायरा बानोशी लग्न केले. असं म्हटलं जातं की, प्रेमामधील अंतःकरण दूर करण्यासाठी मुधबालाने किशोर कुमारशी लग्न केलं, पण मधुबालाचं लग्नाच्या काही वर्षानंतर तरुण वयातच निधन झालं.