दिलीप कुमार यांच्या दुसऱ्या लहान भावाचाही कोरोनामुळे मृत्यू
दुसरा छोटा भाऊ एहसान खान यांचेही कोरोनामुळे निधन
मुंबई : बॉलीवुडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या घरावर कोरोना संकट अधिक गडद झालंय. त्यांचे छोटे भाऊ असलम खान यांचे निधन झाले होते. दरम्यान त्यांचा दुसरा छोटा भाऊ एहसान खान यांचेही निधन झाल्याचे वृत्त समोर येतंय. दिलीप कुमार यांचे दोन्ही लहान भाऊ असलम आणि एहसान कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
२१ ऑगस्टला अस्लम खान यांचे निधन झाले तर आज एहसान खान यांच्या निधनाचे वृत्त आले.
दिलीप कुमार यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन याबद्दल माहिती देण्यात आली. दिलीप कुमार यांच्या कुटुंबाचे मित्र फैजल फारुकी यांनी ही माहिती दिली. दिलीप साहेबांचे सर्वात लहान भाऊ एहसान खान यांचे काही तासापुर्वी निधन झालं. याआधी लहान भाऊ असलम यांचे निधन झाले होते. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. असे फैजल यांनी ट्वीटमध्ये लिहिले. दिलीप कुमार यांच्या वतीने हे ट्टीव फैजल फारुकी यांनी केलं असं देखील ट्वीटच्या शेवटी म्हटलंय.