कोण होते अमर सिंह चमकिला ज्यांची भूमिका साकारण्यासाठी Diljit Dosanjh नं पहिल्यांदाच स्क्रीनवर काढली पगडी?
Diljit Dosanjh as Amar Singh Chamkila : दिलजीत दोसांज या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच स्क्रीनवर पगडी शिवाय दिसणार आहे. त्याला पाहून अनेक त्याचे चाहते संतापले आहेत. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत त्याला ट्रोल केले आहेत. तर कोण आहेत अमर सिंह चमकिला जाणून घेऊया...
Diljit Dosanjh as Amar Singh Chamkila : बॉलिवूड अभिनेता दिलजीत दोसांज हा फक्त त्याच्या अभिनयासाठी नाही तर त्याच्या आवाजासाठी देखील ओळखला जातो. पंजाबमधून करिअरची सुरुवात करणाऱ्या दिलजीतनं त्यांच्या अभिनय आणि गायनानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. आता दिलजीत त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये एका वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. आपल्या सगळ्यांचे आवडते दिग्दर्शक इम्तियाज अली हे आता एक नवा चित्रपट घेऊन आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव चमकिला आहे. तर दिलजीत दोसांझ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात दिलजीत जी भूमिका साकारणार आहे त्या भूमिकेच नाव अमर सिंह चमकिला असं आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे अमर सिंह चमकिला ज्यांच्यावर हा चित्रपट बनवण्यात येत आहे.
'चमकिला' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतीय गायक आणि संगीतकार अमर सिंह चमकिला यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. पंजाबचे सर्वाधिक विक्रमी रेकॉर्ड मोडणारे कलाकार म्हणून अमर सिंह चमकिला ओळखले जातात. त्यांचा जन्म 21 जुलै 1960 साली त्यांचा जन्म झाला होता. पण इतका मोठा कलाकार 1988 साली आपल्याला सोडून गेला. 8 मार्च 1988 साली त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही भूमिका साकारण्यासाठी त्याने त्याच्या डोक्यावरील पगडी पहिल्यांदाच उतरवली आहे. त्यामुळे हा टीझर पाहताना सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. दिलजीतला पगडीवर न पाहून त्याचे अनेक चाहते संतापले आहेत. एक नेटकरी म्हणाला की “दिल टूट गया पाजी… पगडीशिवाय हे चांगलं दिसत नाहीये.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तुम्हाला पाहून काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटत आहे.”
हेही वाचा : Paresh Rawal यांना आलाय 'बाबु भैय्या'चा कंटाळा?
चमकिला यांची जेव्हा हत्या करण्यात आली तेव्हा ते यशाच्या शिखरावर होते. गायक अमित त्रिवेदी यांनी एकदा त्यांना ‘पंजाबचे एल्विस’ (Elvis of Punjab) म्हणून संबोधले कारण त्यांना त्या काळात या नावाने देखील ओळखत होते. रिपोर्ट्सनुसार, गुलजार सिंग शौनकी यांनी अमर सिंह चमकिला यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या आवाज मर्दी नहीन यात सांगितले की ते इतके व्यस्त आणि लोकप्रिय होते की एकदा त्यांनी 365 दिवसांत 366 शो केले.
या चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत परिणीति चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चमकिलाचा टीझक नेटफ्लिक्सवर शेअर करण्यात आला आहे. वयाच्या 28 वर्षी अमर सिंग चमकिला यांची हत्या झाली होती.