Diljit Dosanjh Married : लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या 'चमकीला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 12 एप्रिल रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सगळ्यात त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा आहे. त्याचं आधीच लग्न झालं आहे, त्याची पत्नी आणि मुलगा परदेशात राहतात असं देखील म्हटलं जातंय. दरम्यान, दिलजीतनं अजून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण त्याच्या जवळच्या एका मित्रानं यावर खुलासा केला आहे. त्याविषयी जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलजीत दोसांझनं त्याच्या खासगी आयुष्याला लाइमलाईटपासून लांब ठेवलं आहे. सगळ्यांच्या लाडक्या असलेल्या दिलजीतच्या मित्रानं याबातमीवर शिक्का मोर्तब केला आहे की त्याचं लग्न झालं आणि त्याला एक मुलगा देखील आहे. दिलजीतच्या मित्रानं सांगितलं की त्याचं लग्न झालं असून पत्नी अमेरिकन-इंडियन आहे आणि त्याला एक मुलगा आहे. त्याचे आई-वडील हे लुधियानाला राहतात. 



दिलजीतच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर 1984 मध्ये खूप कमी वयात दिलजीतनं गायनात मजल मारली होती. ज्या गावात तो राहायच्या त्याचे सरपंच माखन सिंह यांनी सांगितल की त्याची वडील बलबीर सिंह पंजाब रोडवेजमध्ये बस ड्रायव्हर होते. वेळ मिळाला की त्याला हॉकी खेळायला आवडायचं. दरम्यान, दिलजीतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या लहाणपणाविषयी एक गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे जेव्हा तो 11 वर्षांचा होता तेव्हाच त्याच्या आई-वडिलांनी त्याला काकाकडे पाठवलं होतं. त्यामुळे आई-वडिलांसोबतच्या त्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. 


16 वर्षांचा असताना केला पहिला अल्बम


दिलजीतच्या पहिल्या अल्बमविषयी बोलताना सिंगर-कंपोजर बलवीर बोपारायनं खुलासा केला की "त्यांनी 2000 मध्ये दिलजीतची संपर्क साधला. त्यावेळी त्याची दाढी देखील आली नव्हती. त्याच्याकडे त्यावेळी लय होती. तो चांगला भांगडा करायचा आणि खूप चांगल्या प्रकारे पगडी बांधायचा. तो फक्त 16 वर्षांचा होता जेव्हा आम्ही त्याच्या पहिला अल्बम 'इश्क दा उडा अदा' प्रदर्शित केला होता. जेव्हा तो 17 वर्षांचा झाला तोपर्यंत एका शोसाठी तो 50 हजार रुपये चार्ज करु लागला होता आणि लग्नाचा सीझन सुरु झाला की त्या दरम्यान, जवळपास प्रत्येक दिवशी त्याची बुकिंग असायची."


हेही वाचा : Heeramandi : 14 वर्षानंतर कमबॅक करणारा फरदीन खान ट्रेलर लॉन्चवेळी झाला भावूक म्हणाला, 'माझ्यासाठी हा...'


दिलजीतच्या कामाविषयी बोलायचे झाले तर गेल्यावर्षी त्यानं इंटरनॅशनल स्तरावर एक म्युजिशियनच्या रुपात पदार्पण केलं होतं. कोचेलामध्ये परफॉर्म करणारा तो पहिला भारतीय आर्टिस्ट झाला आणि त्यानंतर त्यान पॉप स्टार सियासोबत काम केलं. तर अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगमध्ये रिहानाच्या परफॉर्मन्सच्या एक दिवसानंतर दिलजीतनं परफॉर्म केलं होत. त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या क्रू या चित्रपटात तो दिसला होता. यात करीना कपूर, क्रिती सेनन आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. आता त्याचा 'चमकीला' हा चित्रपट येतोय.