Dimple Kapadia Twinkle Khanna: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडिया काही दिवसांपासून 'गो नानी गो' या त्यांच्या कॉमेडी चित्रपटाला घेऊन चर्चेत आहेत. सध्या डिंपल या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्याचं कारण त्यांची लेक ट्विंकल खन्ना आहे. जेव्हा डिंपल यांना लेक ट्विंकल खन्नासोबत फोटो काढण्याची पापाराझींनी विनंती केली त्यावर त्यांनी थेट नकार दिला. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. त्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिंपल यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत डिंपल यांना पाहताच पापाराझी त्यांचे फोटो काढू लागतात तर त्यानंतर त्यांना विनंती करतात की लेक ट्विंकलसोबत फोटो काढा. तर त्याला नकार देत त्या सगळ्यांसमोर ट्विंकलला ट्रोल करताना दिसल्या. डिंपल यांचा हा अंदाज पाहून पापाराझी त्यांच्यावर हसू लागले, तर नेटकरी हैराण झाले. तर अनेकांनी डिंपल यांची तुलना ही जया बच्चन यांच्याशी केली आहे. खरंतर व्हिडीओच्या सुरुवातीला जेव्हा डिंपल यांच्याकडे ट्विंकल फोटो क्लिक करण्याची विनंती करतात तेव्हा त्या म्हणाल्या, मी ज्युनियर्ससोबत पोज दिली नाही. फक्त सीनियर्ससोबत पोज दिली आहे. डिंपल कपाडिया यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

डिंपल यांच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'प्रत्येक व्यक्ती जया बच्चन होतायत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'डिंपलला भिती आहे की ज्युनियर्ससोबत पोज दिल्यानं त्यांचं खरं वय काय हे सगळ्यांना कळेल.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या सगळ्यांनी जया बच्चन यांचं उष्ट खाल्लं असं वाटतंय.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'वयानुसार, प्रत्येक व्यक्ती जया बच्चन होतं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आली जया बच्चन 2.0'


हेही वाचा : KBC 16 मध्ये 25,00,000 साठी विचारण्यात आला 'महाभारता'वर आधारीत प्रश्न; तुम्हाला माहितीये का उत्तर?


दरम्यान, 'गो नानी गो' विषयी बोलायचं झालं तर डिंपल कपाडिया यांनी अभिनय केलेल्या या चित्रपटाची निर्मिती ट्विंकल खन्नानं केली आहे. या चित्रपटात मानव कौल आणि अथिया शेट्टी देखील दिसणार आहेत. डिंपल यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्या सगळ्यात शेवटी शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात दिसल्या होत्या.