Adipurush चा टीझर पाहून रामायणातील `सीता` भडकली, म्हणाली `रावण मुघल..`
`आदिपुरुष` या बिग बजेट चित्रपटात साऊथचा सुपरहिट अभिनेता प्रभास `राम`, क्रिती सेनन `जानकी` आणि सैफ अली खान `रावण`च्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच रीलीज झाला आहे.
Dipika Chikhlia Reaction On Adipurush Teaser: 'आदिपुरुष' या बिग बजेट चित्रपटात साऊथचा सुपरहिट अभिनेता प्रभास 'राम', क्रिती सेनन 'जानकी' आणि सैफ अली खान 'रावण'च्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच रीलीज झाला आहे. एकीकडे या टीझरची खुप चर्चा होत आहे. दुसरीकडे आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर रोज नवा वाद समोर येत आहे. आता रामायण (Ramayan) या पौराणिक मालिकेत सीतेची भूमिका बजावलेली दिपिका चिखलिया हीने रावणाच्या व्यक्तिरेखेबाबत आपलं मत मांडलं आहे.
एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने सांगितले की, "चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या मनात उतरली पाहिजेत. रावण हे पात्र श्रीलंकेचे असेल तर मुघलांसारखं दाखवून कसं चालेल. टीझरमध्ये 30 सेकंदांसाठी रावणाचं पात्र पाहिलं. पण तो वेगळा दिसत आहे." रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत रावणाची भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांच्याशी तुलना करणं योग्य ठरणार नाही, असंही दिपिका पुढे म्हणाली.
Video: Hrithik Roshan मनगटाला बांधलेला काळा धागा कापत म्हणाला, "Vikram Vedha बॉक्स ऑफिसवर..."
"मला मान्य आहे की काळ बदलला आहे आणि VFX हा एक आवश्यक भाग आहे. पण लोकांच्या भावना दुखावल्या जात नाहीत तोपर्यंत." असंही दिपिकाने पुढे सांगितलं. दरम्यान 450 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'आदिपुरुष' 2डी, 3D, 3D IMAX सारख्या डझनभर भारतीय भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.