Dipika Kakar Baby: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कड आणि तिचा पती अभिनेता इब्राहिम हे लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. दीपिकानं 21 जून रोजी त्यांच्या मुलाला जन्म दिला आहे. पण तिचं बाळ हे प्रीमॅच्योअर असल्यानं त्याला NICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की 8 जुलै रोजी दीपिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक माहिती दिली होती आणि ती म्हणजे तिच्या बाळाला NICU मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच्या आरोग्यात खूप चांगली सुधारणा दिसू लागली होती. तर आज तिच्या बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आता ते बाळाला घरी घेऊन गेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका कक्कड आणि शोएबचा रुग्णालयातून घरी जातानाचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत दीपिका आणि शोएब हे दोघे रुग्णालयातून बाहेर येताना दिसत आहेत. तर शोएबच्या हातात त्यांचा मुलगा आहे. ते दोघेही रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर पापाराझी त्यांना शुभेच्छा देत फोटो काढू लागले होते. अशा परिस्थितीत त्या दोघांनी सगळ्यांचे आभार मानले आणि त्यानंतर त्यांना बाळ झोपलं आहे असं सांगत हळू बोलण्यास सांगितले. याशिवाय शोएबनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत घरात स्वागत आहे असे लिहिल्याचे दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दीपिका आणि शोएबनं बाळा असल्यामुळे पापाराझींना हळू बोलण्यास सांगितल्यानं सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की, "उगाच नाटक आहे. आधी मीडियाला बोलवायचं आणि त्यानंतर मग त्यांना शांत बसायला सांगायचं." दुसरा नेटकरी म्हणाला, "दीपिकाला मीडिया आल्याचं आवडलं नाही." तिसरा नेटकरी म्हणाला, "हे कुटुंब आणि त्यांचं खोटं जग हेच आहे फक्त." 



दरम्यान, 2022 मध्ये दीपिकाचं मिसकॅरेज झालं होतं. त्यामुळे तिनं तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीविषयी कोणाला सांगितलं नाही. ज्यावेळी दीपिका आणि शोएबनं त्यांच्या प्रेग्नंसीविषयी सांगितलं तेव्हा त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असून त्यांनी त्या दोघांना खूप शुभेच्छा दिल्या. त्यात बाळाला जन्म दिल्याच्या 20 दिवसांनंतर दीपिका आता बाळासोबत घरी जात आहे. त्या दोघांनी बाळाच्या जन्मानंतरच्या अनेक गोष्टी त्यांच्या व्लॉगमध्ये सांगितल्या होत्या. त्यांच्या व्लॉगवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देत काळजी करा असं सांगत आम्ही तुमच्या बाळासाठी प्रार्थना करत असल्याचं सांगितलं.