Dipika Kakar and Shoaib Ibrahim:  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री फलक नाज ही तिच्या 'ससुराल सिमर का' मालिकेसाठी ओळखली जाते. मात्र, नुकतीच ती 'बिग बॉस ओटीटी सीजन 2' मध्ये दिसली. फलकची एकेकाळी अभिनेत्री दीपिका कक्कडशी खूप चांगली मैत्री होती. मात्र, त्यांच्या मैत्रीला ब्रेक लागला. फलकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका आणि तिचा पती शोएब इब्राहिमविषयी वक्तव्य केलं की लग्न केल्यानंतर दीपिकानं तिची ओळख गमावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फलक नाज आणि दीपिका कक्कडनं 'ससुराल सिमर का' सोबत काम केलं होतं. या दरम्यानच, त्या दोघांची खूप चांगली मैत्री झाली. पण त्यानंतर अचानक त्यांची मैत्री तुटली. फलकनं सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत तिच्या मैत्री आणि दीपिकाविषयी वक्तव्य केलं आहे. यावेळी फलक म्हणाली, 'दीपिका नेहमीच माझ्या प्रार्थनेत असते. पण खऱ्या आयुष्यात नाही राहिली. माझं व्यक्तीमत्त्व असं काही की जर मी एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळची असेल तर कमीत कमी एकदा मी त्याला फोन करून त्याची चौकशी करते. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या इतक्या जवळ येतो तेव्हा त्यांचं आपल्याकडे दुर्लक्ष करणं सहण करणं खूप कठीण होतं. मला याची जाणीव आहे की दीपिका माझ्यावर खूप प्रेम करते. पण मला नेहमी एकच तक्रार असते की तू तुझ्या आयुष्यात इतकी व्यस्त कशी असू शकते की तुला माझ्याशी एकदाही फोन करून बोलण्यासाठी वेळ नव्हता?'



फलक नाज पुढे म्हणाली की तिच्या आणि दीपिकात कोणतंही भांडण झालेलं नाही, पण तरी ते वेगळे झाले. फलकनं सांगितलं की तिनं दीपिकाला एकदा विचारलं होतं की तुला तुझी ओळख गमावल्यानं दु: ख होतं का? फलक यावर सविस्तर सांगत म्हणाली, जर दीपिका आनंदी आहे, तर मी पण आनंदी आहे. लोकांची स्वत: चे काही विचार असतात आणि दीपिकाला त्याचा फरक पडत नाही. ती संसारात व्यस्त आहे आणि लोकांनी याविषयी सकारात्मक गोष्टी बोलायला हव्यात. 



फलक नाजनं पुढे शोएब इब्राहिमसोबत लग्न केल्यानंतर दीपिकानं तिची ओळख गमावल्यावर बोलताना म्हणाली, 'जेव्हा कोणी प्रेमात असतं तेव्हा त्याचं हृदय परिवर्तन होतं आणि त्यांच्यावर कसलीच जबरदस्ती नसते. त्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे आणि ती सगळं तिच्या निर्णयानं करते. शोएब तिच्यावर जबरदस्ती करत नाही आहे तर यावर बोलणारा अजून कोण असत? ते आनंदी आहेत. आपण कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही. दीपिका आनंदी आएह आणि तिच्या प्रेमासाठी ती सगळं करते त्यामुळे त्यात काही चूक नाही आणि यालाच प्रेम म्हणतात.' 


हेही वाचा : लग्नाचे वचन देऊन 4 वर्ष केला अत्याचार अन् गर्भपात; मिथुन चक्रवर्तीच्या मुलाची फसलेली लव्हस्टोरी


फलक दीपिका आणि ती शेवटचे कधी बोलले याविषयी सांगताना म्हणाली की, जेव्हा दीपिकाची नणंद सबाच्या विवाहच्या आधी तिच्या माहेरी आली होती तेव्हा त्यांचं बोलणं झालं होतं आणि तेही मेसेजवर. फलक म्हणाली की दीपिकानं तिला सांगितलं की तिच्यासाठी ती लाडू घेऊन येईन. जे तिला आवडत होते. पण त्यांच्यात असं काही झालं की फलकला खूप वाईट वाटलं कारण फलकला ते लाडू नाही तिची आणि दीपिकाची मैत्री हवी होती. त्यावर दीपिका म्हणाली की मला जे बोलायचं होतं ते मी सांगितलंय. जस्टिफिकेशन दिलं आहे आणि आता ती जास्त बोलणार नाही. तेव्हा फलक दीपिकाला म्हणाली की मला त्याची गरज नाही. तू आनंदी रहा आणि मी पण.