Mithun Chakraborty's son Mahaakshay : बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा आणि अभिनेता महाक्षय चक्रवर्तीचा आज 30 जुलै रोजी वाढदिवस आहे. आज महाक्षय त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करतोय. मिथुन चक्रवर्ती यांना अभिनय क्षेत्रात जसं यश मिळालं तसं त्यांचा मुलगा महाक्षयला नाही मिळालं. महाक्षयनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्याच्या कामा पेक्षा महाक्षय त्याच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असायचा. महाक्षय एकेकाळी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होता. त्याचं कारण म्हणजे महाअक्षय विरोधात बलात्कार, फसवणूक आणि बळजबरीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सगळ्यामुळे महाक्षय चांगलाच चर्चेत आला होता.
महाक्षयवर असलेले हे आरोप बघता त्याचं लग्न देखील मोडलं होतं. महाक्षय आणि मदालसा शर्मा यांच्या लग्नाच्या 5 दिवसांआधी त्याच्यावर बलात्कार आणि बळजबरीनं गर्भपात केल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणानं खूप मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यामुळे महाक्षयचं लग्न मोडलं होतं. ज्या पीडित मुलीनं ही तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारित तिनं म्हटलं होतं की ती आणि महाक्षय 2015 साली रिलेशनशिपमध्ये आले होते. तर महाक्षयनं पीडितला तिच्याशी लग्न करण्याचं वचन देत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते.
महाक्षयनं तिला घरी बोलावलं होतं आणि तिच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये काही मिक्स करून दिलं होतं. त्यानंतर त्यानं तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर लग्न करणार असं सांगितले. महाक्षय नं त्या मुलीसोबत 4 वर्षे शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा ती प्रेग्नंट राहिली तेव्हा महाक्षयनं तिला गर्भपात करण्यास बळजबरी केली. त्या मुलीला हे मान्य नव्हतं तर तिला एक दिवस काही गोळ्या दिल्या आणि त्यानं तिचा गर्भपात केला. पीडित महिलेनुसार, तिला माहित नव्हतं की महाक्षयनं ज्या गोळ्या दिल्या आहेत त्या गर्भपातासाठी आहेत.
हेही वाचा : ऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मद्यधूंद अवस्थेत पडलेला असायचा सलमान! 'देवदास'च्या सेटवरील घटनाक्रम चर्चेत
महाक्षय त्या पीडितला म्हणाला की तो त्याच्या घरच्यांना त्यांच्या लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपली कुंडली जुळत नसल्यानं आपलं लग्न होऊ शकणार नाही. त्यानंतर महाक्षयची आई योगिता बालीनं त्या पीडित मुलीला फोन करून धमकी दिली आणि सांगितलं की तुला सून बनवू शकतं नाही. त्यासोबत मिथुन यांना याविषयी काही न सांगण्यास देखील त्यांनी सांगितलं. अशात जेव्हा त्या अभिनेत्रीला महाक्षयच्या लग्नाविषयी कळलं तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तर महाक्षयच्या होणारी सासू शीला शर्मा यांनी सांगितले की ज्या दिवशी लग्न ठरलं आहे त्याच दिवशी होईल. त्या दोघांचं लग्न मोडलेलं नाही. पण लग्नाच्या वेळी पोलीस पोहोचले तर त्याचं लग्न मोडलं होतं. पण त्याच्या काही दिवसांनंतर महाक्षय आणि मदालसा शर्मा यांनी हिंदू परंपरेनुसार लग्न केले.