Shoaib Ibrahim नं शेअर केला दीपिकाच्या डिलिव्हरीचा व्हिडीओ, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच म्हणाला...
Dipika Kakar Baby: दीपिका कक्कडनं 21 तारखेला तिच्या मुलाला जन्म दिला होता. तिचा मुलगा प्री मॅच्युअर असल्यानं त्याच्या आरोग्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. तर दीपिका आणि बाळाच्या डिस्चार्जवि,यी सतत चाहते विचारत असलेल्या चाहत्यांना दीपिकानं त्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
Dipika Kakar Baby: अभिनेता शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कड यांची जोडी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल्स पैकी एक आहे. शोएब त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच वडील झाला. शोएब आणि दीपिकानं बाळाच्या जन्मानंतर अनेक गोष्टी सांगितल्या. पण त्यांनी दीपिका कशी रुग्णालयात गेली आणि तिची डिलिव्हरी कशी झाली याविषयी सांगत त्यांचा पालक होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे.
शोएबनं त्याच्या व्लॉगमध्ये दीपिकाचा हा संपूर्ण प्रवास दाखवला आहे. शोएबनं 27 जून रोजी त्याच्या युट्यूब चॅनलवर हा व्लॉग शेअर केला आहे. यावेळी या डिलिव्हरी व्लॉगला त्यांनी नाव दिलं आहे की ज्यादिवशी आम्ही पालक झालो. या व्हिडीओत दीपिकाची आई आणि नणंद सबा पाहायला मिळत आहे. तर शोएब पूर्ण वेळ दीपिकासोबत दिसत आहे. तर दीपिकाची परिस्थिती पाहून त्याला भीती वाटली होती असे देखील शोएबनं यावेळी सांगितले. याशिवाय शोएबनं सांगितलं की दीपिकाला 3 दिवसात डिस्चार्ज देण्यात आलं होतं. पण आम्ही मीरा रोडला राहत असल्याने आम्हाला तिथून इथे येण्यात खूप त्रास झाला असता म्हणूण आम्ही घरी गेलो नाही. डॉक्टर अजून सात दिवस बाळावर लक्ष ठेवतील अशी शक्यता असल्याचे देखील शोएबनं सांगितलं.
हेही वाचा : काहीही कारण नसताना Dharmendra यांची पत्नी- मुलींसाठी भावनिक पोस्ट; चाहत्यांची चिंता वाढली
शोएबची लहाण बहीण सबानं तिच्या व्लॉगमध्ये दीपिकाच्या डिलिव्हरीच्या रात्रीचा किस्सा सांगितला होता. तिनं सांगितलं होतं की "20 तारखेला भावाचा वाढदिवस होता. आम्ही रात्री जेवायला गेलो होतो. जेवून आल्यानंतर आम्ही झोपलो. तेव्हाच रात्री 3 च्या सुमारास दादाचा फोन आला. तर त्यावेळी मला वाटलं की आम्ही झोपलो पण ते जागे असतील त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे म्हणून त्यांनी मला विचारण्यासाठी फोन केला. मी फोन रिसिव्ह करताच मला दादा म्हणाला की मी दीपिकाला घेऊन रुग्णालयात जात आहे."
सबाला तिला दीपिकाची चिंता वाटू लागली होती. काही कॉम्पलिकेशन्स असतील तर याविषयी ती विचार करू लागली होती. पण बाळाच्या जन्मानंतर आता सबानं दीपिकाची स्तुती केली. सबा म्हणाली की ती खूप स्ट्रॉंग आहे. तिनं सगळं खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं. सबा पुढे म्हणाली की "आम्ही कसे बसे रुग्णालयात पोहोचलो. तर डॉक्टर म्हणाले बाळाचा जन्म आताच होईल. तेव्हा डॉक्टर हे देखील म्हणाले की सगळं काही ठीक आहे. त्यावेळी दादाला खूप चिंता सतावत होती. आता हळू हळू सगळं ठीक होत आहे."
दीपिकानं 21 जून रोजी तिच्या मुलाला जन्म दिला. तिचा मुलगा हा प्रीमच्युअर बेबी असल्यामुळे आयसीयू मध्ये अॅडमिट आहे. त्यामुळे डॉक्टरांना सध्या बाळाच्या आरोग्यावर थोडे जास्त लक्ष द्यायचे आहे. दीपिकानं मुलाला जन्म देऊन आता 7 दिवस होऊन गेले आहेत