Dipika च्या घरी आला राजकुमार! Premature डिलीवरीनंतर पतीने दिली प्रतिक्रिया...
Dipika Kakar Baby : दीपिकांने आज सकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिल्याची गोड बातमी पती शोएब इब्राहिमनं यांनी सोशल मीडियावर दिली. इन्स्टाग्रामवर स्टेट्समधून त्याने आनंद व्यक्त केला.
Dipika Kakar Baby Boy : छोट्या पडद्यावरील 'ससुराल सिमर का' ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कडने राजकुमाराला जन्म दिला आहे. दीपिका आणि शोएब इब्राहिम यांच्या घरी तब्बल 5 वर्षांनंतर पाळणा हलला आहे. शोएबने इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवून ही आनंदाची बातमी दिली आहे. 'अलहमदुलिल्लाह, आज 21 जून 2023 ला आम्हाला मुलगा झाला. ही प्रीमॅच्योर प्रसूती आहे. पण काळजी करण्यासारखं काही नाही.' (dipika kakar shoaib ibrahim blessed with baby boy on 21 june 2023)
दीपिका आणि शोएब अनेक वर्षांपासून या दिवसाची वाट पाहिली होती. काही दिवसांपूर्वी दीपिकाने जुळ्या मुलांना जन्म दिला अशी अफवा पसरली होती. त्यानंतर शोएबने स्पष्टीकरण दिलं होतं. दीपिका आणि शोएब हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय आहेत.
दीपिकाने सोशल मीडियावरूनच ही गोड बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर तिने गर्भवती अवस्थेतील तिची जर्नी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन अपडेट देत होती. दरम्यान दीपिकाला जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्याची तारीख देण्यात आली होती. दीपिकाची प्रीमॅच्युअर डिलीव्हरी झाली आहे. दीपिका आणि शोएब या दोघांनी इन्स्टाग्रामवर स्टेट्सवर ही माहिती दिली आहे.
दीपिका आणि शोएब या दोघांनी ससुराल सिमर का या मालिकेतून या दोघांनी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या मालिकेदरम्यानच या दोघांचं सुत जुळून आलं. 22 फेब्रुवारी 2018 या दोघांनी लग्न केलं.
विशेष म्हणजे काल मंगळवारी 20 जूनला शोएबचा वाढदिवस होता. दीपिकाने मुलाला जन्म देऊन खास वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आहे.
दीपिका आणि शोएबचा वर्क फ्रंट
या दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दीपिकाने गरोदरपणात ब्रेक घेतला आहे. काही वेळापूर्वी एका मुलाखतीत दीपिकाने सांगितलं होतं की, ''तिला कुटुंबासाठी थोडा वेळ द्यायचा आहे आणि गरोदरपणाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून मी कामातून ब्रेक घेतला आहे.''
तर शोएब स्टार भारतच्या अजुनी या शोमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकतोय.