Dipika Kakar Video : सोशल मीडिया एक असं माध्यम आहे, ज्यामुळे कोणतीही गोष्ट काही क्षणात जगभरात व्हायरल होते. आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘ससुराल सिमर का’ (Sasural Simar Ka) अभिनेत्री  दीपिका कक्करने असं काही केलं, जे पाहून तुम्हीही म्हणाल दीपिकाने (dipika kakar first husband) असं करायला नको होतं. सध्या दीपिकाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. (dipika kakar age)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाने दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी दीपिकासोबत पती शोएब इब्राहिमही होता. दोघांनी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एन्ट्री घेताच सर्वांच्या नजरा दोघांकडे येवून थांबल्या. व्हिडीओमध्ये दीपिका चालता-चालता अडखळली. (dipika kakar instagram)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


उंच हिल्समध्ये चालताना दीपिकाचा तोल गेल्यामुळे अभिनेत्रीला वाचवण्यासाठी एक व्यक्ती पुढे आला. तेव्हा दीपिकाने त्या व्यक्तीवर संताप व्यक्त केला. दीपिकाची अशी प्रतिक्रिया पाहून सोशल मीडियावर अनेक जण अभिनेत्रीचा विरोध करत आहेत. सध्या सर्वत्र दीपिकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (dipika kakar movies and tv shows)


दीपिकाचा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केली आहे. एक युजर दीपिकाला म्हणाला, 'ब्लॉगमध्ये स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी किती चांगला प्रयत्न करते, पण याठिकाणी ज्याने मदत केली त्यालाच रागावते...', तर दुसऱ्या युजरने, 'तुझा असा व्यवहार बिलकूल चांगला नाही...' अशी कमेंट केली आहे.