मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा विवाहसोहळा म्हणजे एक प्रकारची परिकथाच आहे. सहा वर्षांपासूनच्या रिलेशनशिपला अखेर नात्याचं नाव देत रणवीर-दीपिका इटलीतील लेक कोमो येथे विवाहबद्ध झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वांच्याच आवडीच्या अशा या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नाची माहिती मिळताच कलाकार मंडळींपासून चाहत्यांपर्यंत प्रत्येकानेच या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. 


दीपिका आणि रणवीरचा विवाहसोहळा हा अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. मग त्यात सहभागी होणारे पाहुणे मंडळी असो किंवा कोणत्याच स्वरुपातील भेटवस्तू न स्वीकारण्याचा दीप-वीरचा निर्णय. 


लग्नात आपल्याला भेटवस्तू देण्यापेक्षा दीपिकाच्या द लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन या संस्थेला पाहुण्यांनी मदत करावी असा निर्णय या दोघांनीही घेतला. त्यांच्या या निर्णयाची सर्वच स्तरांतून भरभरुन प्रशंसाही झाली. 


दीप-वीरच्या या निर्णयानंतरही तिला या कलाविश्वात पहिली संधी देणारी दिग्दर्शिका, नृत्यदिग्दर्शिका फराह खान हिने त्यांच्यासाठी एक खास भेटवस्तू देण्याचं ठरवलं आहे. किंबहुना ही भेटवस्तू काय असणार याची रणवीर दीपिकालाही कल्पना आहे. 


काही दिवसांपूर्वी लग्नसोहळ्यासाठी इटलीला रवाना होण्यापूर्वी या जोडीने फराह खानची भेट घेतली होती. तेव्हाच सेलिब्रिटी life casting artist भावना जसरा यांच्याकडून त्यांच्यासाठी फराहने ही अनोखी भेटवस्तू त्यांया नजरेत आणली. 



दीपिका आणि रणवीरच्या हातांची प्रतिकृती, तिने भेट स्वरुपात देण्याचं ठरवलं आहे. फराहची ही भेटवस्तू या दोघांसाठीही एक वेगळी आणि आयुष्यभर स्मरणात राहील अशीच भेटवस्तू आहे, असं म्हणायला हरकत नाही.