मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकार नावारुपास येऊ लागले, की त्यांच्या मानधनाचा आकडाही वाढू लागतो. प्रसिद्धीझोतात येण्यासोबतच या कलाकारंच्या वाट्याला तगडे चित्रपटही येऊ लागतात. एका आखाडीच्या अभिनेत्रीबाबतही असंच काहीसं घडत गेलं आणि पाहता पाहता ती इतकी गाजली की अतिशय कमी वेळातच तिनं कमाईच्या बाबतीत स्वत:च्या वडिलांनाही मागे टाकलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री आहे, आलिया भट्ट. 2012 मध्ये आलियानं 'स्टूडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पाहता पाहता ती यशाची एक- एक पायरी लढू लागली. 


आलियाचा हा प्रवास पाहून तिचे वडील, दिग्दर्शक महेश भट्ट यांना कमालीचा आनदं होतो. 


आपल्याला जितकी कमाई करण्यासाठी 50 वर्षांचा काळ लागला, तोच आलियानं मात्र ही किमय़ा अवघ्या 2 वर्षांमध्ये करुन दाखवली आहे. 


एका मुलाखतीत बोलताना त्यांनी आपल्या मुलीची प्रशंसा केली. 'ती तिच्या आईवडिलांसारखी नाहीये. तिच्यामध्ये एक धग आहे.' असं म्हणत आलिया अतिशय एकाग्रतेनं काम करते हे त्यांनी स्पष्ट केलं. 


अभिनेता रणबीर कपूर याच्यासह आलिया डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामुळं महेश भट्ट यांची ही लाडकी लेक, कपूर कुटुंबात जाणार आहे. 


आगामी चित्रपटांबाबत सांगावं तर, आलिया रणबीरसोबतच 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून झळकणार आहे. याशिवाय ती 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातही मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे.