आता इंटिमेसी दिग्दर्शकही येणार समोर, ज्यांच्या मदतीने सेक्स आणि किस सीन होतात शूट
इंटिमेसी दिग्दर्शक... ज्यांच्या मदतीने सेक्स आणि किस सीन होतात शूट
मुंबई : ‘कपूर एण्ड सन्स’ फेम दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा नवा चित्रपट 'गहराईया' लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ज्यावर चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांना त्यांच्या कामाचे श्रेय देण्यात आलं. यामध्ये यूक्रेनियन फिल्ममेक डार गै यांना इंटिमेसी दिग्दर्शकाचं श्रेय देण्यात आलं आहे.
ही बाब लेखक असीम छाबरा यांनी ही लोकांसमोर आणली. असीम छाबरा ट्विट करत म्हणाले, 'मी चुकीचा असू शकतो पण मी पहिल्यांदाच एका भारतीय चित्रपटात इंटीमसी दिग्दर्शकाचे श्रेय पाहिले. मी डर गाईला ओळखतो, त्यामुळे या चित्रपटात त्यांचे योगदान काय होते हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.'
कसे होतात इंटिमेसी सीन शूट
डान्स कोरीओग्राफर करतात मदत
हुकअप सीन आकर्षक बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. न्यूयॉर्कमधील कोरिओग्राफर ट्रिशिया ब्रूक इंटिमेट सीन कोरिओग्राफी करण्यात माहिर आहेत. ती तिच्या जोडीदारासोबत पहिले सीन करून दाखवते. मग ती कलाकारांना शिकवते. यामुळे कोणत्याही अभिनेत्याला असुरक्षित वाटत नाही.
हॉलीवूडमध्ये इंटिमेसी कोरियोग्राफर आहेत. त्याचे काम सेक्स सीन कोरिओग्राफ करणे आहे. ही दृश्ये डान्स नंबर किंवा स्टंट सीक्वेन्सप्रमाणे चित्रीत केली जातात. अनेक कलाकारांना न्यूड सीन देण्यात कोणतीही अडचण येत नाही. पण काहींना मात्र अस्वस्थ वाटतं. अशा कलाकारांसाठी कॉक सॉक आणि स्नॅच पॅचसारख्या गोष्टी वापरल्या जातात. अभिनेता कॉक सॉक वापरून त्याचा प्रायव्हेट पार्ट लपवतात.
मासिक पाळी दरम्यानही होतं इंटिमेट सीनचं चित्रीकरण
अभिनेत्रींना मासिक पाळी दरम्यानही इंटिमेट सीनसाठी काम करावं लागतं. चित्रीकरण चित्रपटांमध्ये सेक्स सीन करताना महिलांना लँडिंग स्ट्रिप्ससारखे कपडे घातले जातात. ऑन-सेट कॉस्च्युम डिझायनर सारा बस्ता यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रींना मासिक पाळी असतानाही इंटिमेट सीन शूट करावे लागतात.
दिग्दर्शकाने 'कट' म्हटल्यानंतर अभिनेते न्यू़ड होऊन फिरत नाहीत
सीन शूट करताना कलाकार न्यू़ड असणे आवश्यक असतं. पण सीन शूट होत असताना दुसऱ्या विभागातील व्यक्ती सेटवर नसतो. सीन शूट झाल्यानंतर इंटिमेसी कोरियोग्राफर कलाकारांना झाकण्यासाठी बाथरोबम घेवून दुसऱ्याबाजूला उभे असतात.