Jeetendra : बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे जितेंद्र. 70-80 च्या दशकात त्यांनी या चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. त्यांनी आजवर अनेक गाजलेले चित्रपट आणि भूमिका दिल्या आहेत. पण इथवर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप स्ट्रगल केलं. त्यांच्या पदार्पणाच्या चित्रपटातून त्यांना दिग्दर्शकानं बाहेरचा रस्ता दाखवला होता. जितेंद्र यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. त्यातील त्यांचे 56 चित्रपट हे हिट ठरले. इतकंच नाही तर जिंतेंद्र यांनी चित्रपटांबाबतीत अमिताभ बच्चन, राजेश खन्ना आणि शाहरुख खानला देखील मागे टाकलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडस्ट्रीमध्ये ते सगळ्यात चांगला भिनय आणि डान्सशिवाय त्यांच्या पांढऱ्या कपड्यांमुळे देखील ते चर्चेत असायचे. आज जितेंद्र हे चित्रपटसृष्टीपासून लांब असले तरी देखील ते अनेक कार्यक्रमांमध्ये दिसून येतात. इथपर्यंत पोहोचायला त्यांनी करिअरमध्ये खूप कष्ट केलं आणि जेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांना खूप ओरडा पडला होता.  खरंतर जितेंद्र यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला एक्स्ट्रा आर्टिस्टम्हणून काम केलं. ज्या दिवशी सेटवर कोणी येऊ शकत नव्हतं, तेव्हा त्याच्या जागी ते काम करायचे. पहिल्या चित्रपटात त्यांनी अभिनेत्रीच्या बॉडी डबलची भूमिका साकारली. त्यांच्या याच बॉडी डबलच्या भूमिकेमुळे त्यांचं संपूर्ण नशिब पालटलं. 


जितेंद्र यांनी एका रिअॅलिटी शोमध्ये स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता. जेव्हा ते त्यांच्या 'सेहरा' या डेब्यू चित्रपटाचं शूटिंग करत होते. तेव्हा ते ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्यांना 8 वाजता पोहोचायचं होतं. पण ते अर्धा तास उशिरा पोहोचले. फक्त अर्धा तास उशिर झाल्यामुळे दिग्दर्शक शांतारामनं त्यांना सांगितलं की निघून जा. याला काठा इथून, बॉम्बेला पाठवा. मला त्याचं तोंड पाहायचं नाही आणि मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला. 


हेही वाचा : अमिताभ यांची मिमिक्री करून कॉमेडी किंग झाला, 41 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर घेतला अखेरचा श्वास


इतकंच नाही तर जितेंद्र यांनी सांगितलं की जेव्हा त्यांनी ही गोष्ट त्यांच्या वडिलांनी ही गोष्ट सांगितलं तेव्हा ते देखील त्याला ओरडले होते. त्यांनी मला परत त्यांच्याकडे जा असं सांगितलं. त्यानंतर मी कधीच ओरडा किंवा मार खाल्ला नाही मी नेहमीच वेळेवर राहू लागलो. त्या सगळ्यानं माझं आयुष्य बदललं.