Madhuri Dixit and Amitabh Bachchan : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकत्र काम केलेलं नाही. तर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एकत्र काम केले मात्र, आपल्या सगळ्यांना कधी याविषयी कळलंच नाही. त्यात बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित आणि बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन आहेत. त्या दोघांना एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी अनेक चाहत्यांची इच्छा होती. त्यात आता अशी माहिती समोर आली आहे की अमिताभ आणि माधुरी आपल्या सगळ्यांना एका चित्रपटात दिसणार होते मात्र, काही कारणांमुळे माधुरीला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ आणि माधुरी या दोघांनी एक चित्रपट साईन केला होता. हा चित्रपट दिग्दर्शक टीनू आनंद यांचा होता. या चित्रपटाविषयी टीनू यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता. या मुलाखतीत त्यांनी 'शहेनशाह' आणि 'कालिया' या चित्रपटांविषयी सांगितलं आहे. टीनू यांनी रेडिओ शोला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की 'शिनाख्त चित्रपटासाठी अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित एकत्र काम करणार होते. यातील एका शॉटमध्ये माधुरीला ब्रा घालून सीन द्यायचा होता. मी तशी तिला आधीच कल्पना दिली होती आणि त्यानंतर तिनं चित्रपटाला होकार दिला होता. एक सीन होता ज्यात  अमिताभ यांना गुंडांनी साखळीने बांधलेले असते. तर माधुरी त्यावेळी समोर उभी असते. तेव्हा माधुरी म्हणते, तुम्ही साखळीनं बांधलेल्या माणसावर हल्ला करताय तेही एका मुलीसमोर. यानंतर तिला ब्लाऊज काढून ब्रामध्ये कॅमेऱ्यासमोर यावं लागणार होतं. मी तिला तिच्या सोयीनुसार ब्रा डिझाईन करायला सांगितली होती. तुला हवा तसं डिझाईन कर पण ते ब्रा चं असलं पाहिजे त्याला पाहून ब्लाऊज आहे असं वाटायला नको.'


याविषयी सांगताना टीनू आनंद पुढे म्हणाले, 'सीन शूट करण्याच्या आधी माधुरी व्हॅनमध्ये तयार होत होती. बराच वेळ झाला ती आली नाही. त्यामुळे मी नक्की काय करते अजून कशी तयार झाली नाही हे पाहण्यासाठी मी तिच्या व्हॅनमध्ये गेलो तर पाहतो की ती अजून तयार झालीच नाही. हे पाहून मी तिला विचारलं की अजून तयार का झाली नाहीस. त्यावर उत्तर देत माधुरी म्हणाली की मी हा सीन देऊ शकणार नाही. मी म्हटलं तुला आधीच सांगितलं होतं. आता तुला सीन करावाच लागेल. तरी ती त्याच्यापुढे नाही म्हणाली, म्हणून मी तिला थेट पॅकअप करुन चित्रपट सोडायला सांगितला.'


हेही वाचा : पंतप्रधानांनतर हृतिक रोशन सर्वात जास्त पॉवरफुल व्यकी होता, पण...; अमीषा पटेलचं वक्तव्य चर्चेत


टीनू आनंद पुढे म्हणाले की 'हे पाहता अमिताभ बच्चन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगितलं की तिला अडचण होती तर तिनं चित्रपटाला होकार का दिला. मी नंतर लगेच दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरु केला. पण माधुरीच्या सेक्रेटरीने सांगितलं की थोडं थांबा ती तयार होईल.' पण त्यानंतर टीनू आनंद आणि माधुरीने कधीच एकत्र काम केलं नाही.