Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही सध्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. या सगळ्यात अमीषानं अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. त्या मुलाखतीत अमीषानं तिच्या खासगी आयुष्यासोबतच कामाविषयी देखील अनेक गोष्टींवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. त्यात अमीषानं हृतिक रोशनवर एक असं वक्तव्य केलं आहे जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अमीषानं म्हटलं की 'कहो ना प्यार है' चित्रपटातून धमाकेदार डेब्यू केल्यानंतर हृतिक रोशन हा प्रधानमंत्रीनंतर सगळ्यात पावरफूल व्यक्ती होता. पण ज्या प्रेक्षकांनी त्याला इथ पर्यंत पोहोचवलं त्याच लोकांनी हृतिक रोशनला खाली आणले.
अमीषा पटेलनं ही मुलाखत सिद्धार्थ कननला दिला होता. या मुलाखतीत अमीषानं म्हटलं की आता ती हृतिक रोशनच्या संपर्कात आहे आणि त्याचे वडील राकेश रोशन यांनी 'गदर 2' च्या सक्सेसनंतर मला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज देखील केला होता. त्याच्या पुढे अमीषा म्हणाली की 'कहो ना प्यार है नंतर हृतिक रोशन बड्या दिग्दर्शकांसोबत काम करत होता. उदा. सूरज बडजातिया, सुभाष घई, यश राज फिल्म्स... माझ्यासोबत देखील काम केले होते पण त्याचं काम हे त्याची लोकप्रियता वाढवत नव्हते. मी आणि तो एकदिवस रात्री या गोष्टीवर चर्चा करत होतो की कशा प्रकारे एका शुक्रवारी हृतिक हा पीएमनंतर सगळ्यात जास्त पावरफूल व्यक्ती झाला आणि दुसऱ्याच शुक्रवारी त्याचे चाहते त्याच्या चित्रपटांची अपेक्षा करत नव्हते. हे कसं जग आहे? पण मला असं वाटतं की हृतिक ग्रीक गॉड आहे, तो नेहमीच सुपरस्टार राहिल. चांगल्या टॅलेन्टला कधीच हलवू शकत नाही.'
अमीषा पटेल पुढे म्हणाली की 'तिला वाईट वाटायचं की लोक त्याचा चित्रपट पाहणं पसंद करत नव्हतं. ते म्हणायचे की हृतिक रोशन फक्त एक चित्रपटातील अभिनेता आहे. असा कोणाला टॅग देनं चुकीचं आहे. त्यानंतर मी एक घोषणा ऐकली आणि ती म्हणजे राकेश काका हे 'कोई मिल गया' हा चित्रपट घेून येत आहेत. तेव्हा मला वाटलं की हृतिक यातून कमबॅक करेल. जेव्हा आम्ही 'आप मुझे अच्छे लगने लगे' या चित्रपटासाठी काम करत होतो तेव्हा तो खूप चिंतेत असायचा. तो मला बोलायचा की अमीषा तू तर दुसरा चित्रपट गदर केला, मी फ्लॉप देतोय आणि तुझा चित्रपट हिट होतोय. मी त्याला म्हटलं की टेन्शन घेऊ नकोस कारण काळ बदलतो.'
हेही वाचा : Jawan ला पायरसीचा फटका! पहिला शो प्रदर्शित होताच...; गौरी खानला होऊ शकतं नुकसान
अमीषाच्या 'गदर 2' चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर मंगळवारी चित्रपटानं काही चांगली कमाई केली नव्हती. त्यात आज शाहरुख खानचा जवान हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होईल का अशी चर्चा सुरु आहे.