Prachi Desai: टेलिव्हिजन (Television) आणि बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्रीला (Actress) फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Film Industry) कास्टिंग काउचला (Casting Couch) सामोरं जावं लागलं होतं. एका मोठ्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्या अभिनेत्रीला तडजोड करण्यास सांगितलं होतं. एवढंच नाही तर, दिग्दर्शक (Director)तिच्यामागे लागला होता. तिला चित्रपटासाठी शारीरिक रिलेशनशिप (Relationship) बनवण्याची ऑफरही दिली होती. दिग्दर्शकाने शारीरिक संबंधाची मागणी करताचं तिचं नशिब बदललं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार अभिनेत्री प्राची देसाई (Prachi Desai) हिच्यासोबत घडला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टीव्हीमध्ये इतके मोठे नाव कमावल्यानंतरही प्राचीला या गोष्टीचा सामना करावा लागला होता. दिग्दर्शकाने शारीरिक संबंधाची मागणी करताचं प्राचीने ताबडतोब ही ऑफर फेटाळली. आज तिच्या आयुष्यातील या घटनेची आठवण होण्यामागंच कारण म्हणजे प्राची आज आपला 34 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. (director wanted to make Physical relationship prachi desai)



टीव्हीचा लोकप्रिय शो 'कसम से' (Kasam se) यातून प्राची घरोघरी पोहोचली आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं. वर्षानुवर्षे टीआरपी चार्टवर राज्य करणाऱ्या या शोमधून प्राचीने बरीच प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर प्राचीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि तिथेही अभिनयाच्या जोरावर तिने आपलं स्थान निर्माण केलं. 


टीव्ही ते बॉलिवूडचा प्रवास


प्राची देसाई शेवटची 'फॉरेंसिक्स'(Forensics) चित्रपटात दिसली होती. तिने 'झलक दिखला जा 2'(Jhalak Dikhla Ja 2) या डान्स रिअॅलिटी शोची ट्रॉफीही जिंकली. प्राचीने 'रॉक ऑन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली, जो चाहत्यांनाही खूप आवडला. प्राचीने अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), अजय देवगण (Ajay Devgn), जॉन अब्राहम (John Abraham) आणि इमरान हाश्मीसह (Emraan Hashmi) मोठ्या नावांसह स्क्रीन स्पेस शेअर केली.