मुंबई : सेलिब्रिटींचे आयुष्य खूप सोपे वाटते पण त्यांना त्यांच्या पातळीवर अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. अनेक वेळा, एखाद्या सेलिब्रिटीसाठी, त्याचे चाहते जीवावर उदार होतात पण कधीकधी महिला सेलिब्रिटींना यामुळे त्रास ही सहन करावा लागतो. अलीकडेच असेच काहीसे बंगाली टीव्ही अभिनेत्री पायल सरकारसोबत घडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकप्रिय बंगाली टीव्ही अभिनेत्री पायल सरकार हिने कोलकाता पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे तक्रार केली आहे, एका चित्रपट दिग्दर्शकाच्या बनावट अकाऊंटवरून काही अश्लील मेसेज आल्यानंतर तिने याबाबत तक्रार दाखल केलीये. सोशल मीडियावर दिग्दर्शकाचे बनावट अकाऊंट बनवणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


झी म़ीडियाला मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने प्रसारमाध्यमांना सांगितले की तिने एका प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर तिला चॅट करतांना सांगण्यात आले की, एका आगामी चित्रपटासाठी तिची निवड करण्यात आली आहे. पण नंतर तिला अश्लील संदेश पाठवले गेले.



अभिनेत्रीने तिच्या फेसबुक प्रोफाइलवर चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला जिथे तिच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी तिला चित्रपट दिग्दर्शकाचे प्रोफाइल तपासण्यास सांगितले. यानंतर तिला समजले की ते एक बनावट प्रोफाइल आहे. सुरुवातीला कोलकाता पोलीस सायबर सेलमध्ये नोंदवण्यात आलेले प्रकरण नंतर बॅरकपूर पोलीस आयुक्तालयात हस्तांतरित करण्यात आले.



पोलीस काय म्हणाले?


सोशल मीडिया अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “ती बारानगरमध्ये राहत असल्याने, प्रकरण बॅरकपूर पोलीस आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. आम्ही खाते निलंबित केले आहे आणि खात्याचे तपशील तपासत आहोत. आम्हाला आशा आहे की ती व्यक्ती लवकरच सापडेल.