`न्यूड` सिनेमाचं पहिलं गाणं `दिस येती` रिलीज
रवी जाधव दिग्दर्शित `न्यूड` या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचं पहिलं गाणं दिग्दर्शित झालं आहे. या सिनेमातील दिस येती या गाण्याने न्यूड आर्टिस्टचं संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांसमोर ठेवलं आहे. हे गाणं सायली खरे हिने गायलं आहे जिने न्यूड या सिनेमात न्यूड आर्टिस्टची भूमिका साकारली आहे. या गाण्यातून कल्याणी मुळे साकारत असलेल्या न्यूड आर्टिस्टचं जगणं समोर येत आहेत.
मुंबई : रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचं पहिलं गाणं दिग्दर्शित झालं आहे. या सिनेमातील दिस येती या गाण्याने न्यूड आर्टिस्टचं संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांसमोर ठेवलं आहे. हे गाणं सायली खरे हिने गायलं आहे जिने न्यूड या सिनेमात न्यूड आर्टिस्टची भूमिका साकारली आहे. या गाण्यातून कल्याणी मुळे साकारत असलेल्या न्यूड आर्टिस्टचं जगणं समोर येत आहेत.
कोण आहे न्यूड आर्टिस्ट? कशा तयार होतात न्यूड आर्टिस्ट? समाजात न्यूड आर्टिस्टला काय वागणूक मिळते? यासारख्या प्रश्नांवर रवी जाधवचा न्यूडा हा सिनेमा भाष्य करतो. दिस येती हे गाणं झी म्युझिक मराठीच्या अंतर्गत प्रदर्शित झालं असून ते सायली खरेने संगीतबद्ध केलं आहे.
न्यूड सिनेमाचं पहिलं गाणं 'दिस येती'
न्यूड सिनेमावर करण्यात आली होती बंदी
गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही त्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर एस दुर्गा या महोत्सवातूनही हा सिनेमा वगळण्यात आला होता. इतकंच नाही तर सिनेमासाठी रवी जाधव कोर्टाची पायरीही चढले. या सगळ्यात मात्र मराठी सिनेसृष्टीने रवी जाधव यांना पाठिंबा दिला.