आता #DisappointingAdipurish ट्रेंड, रावणाच्या हेअरकटपासून VFX पर्यंत प्रेक्षकांची नाराजी
Disappointing Adipurish : टीझर रिलीज झाल्यानंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या झलकमुळे लोक संतप्त झालेले दिसत आहेत.
Disappointing Adipurish : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाच्या वादानंतर आता सोशल मीडियावर नवीन ट्रेंड पाहिला मिळतो आहे. #brahmastraboycott नंतर सोशल मीडियावर अजून एक मोठ्या स्टारकास्ट असेलल्या चित्रपटत रिलीज होण्यापूर्वीच ट्रोल होतो आहे. सुपरस्टार प्रभास (Prabhas), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच टीकेची झोड उडली आहे. 'तान्हाजी'च्या (Tanhaji) यशानंतर दिग्दर्शक ओम राऊतच्या (Om Raut) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र टीझर रिलीज झाल्यानंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या झलकमुळे लोक संतप्त झालेले दिसत आहेत. (disappointing adipurish trend on twitter and Prabhas Kriti Sanon Saif Ali Khan nmp)
सरयू नदीच्या काठावर चित्रपटातील 'रावणाच्या भन्नाट लूक'पासून ते 'VFX'पर्यंत या टीझरवर लोक खूपच निराश दिसत आहेत. त्यामुळे #DisappointingAdipurish हॅशटॅग (Hashtag) ट्विटरवरही (Twitter) खूप ट्रेंड (trend) करत आहे. 'आदिपुरुष'च्या या टीझरमुळे लोकांची इतकी निराशा होत आहे की, यानंतर 'ब्रह्मास्त्र' VFX बद्दलचा आदर वाढल्याचे सोशल मीडियावर अनेकांनी सांगितलं.
दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे 50 फूट उंचीचे पोस्टर आणि टीझर अयोध्येत लाँच करण्यात आलं. टीझरमध्ये श्रीरामच्या (Shriram) भूमिकेत प्रभास, रावणाच्या (Ravana) भूमिकेत सैफ अली खान आणि सीतेच्या (Sita) भूमिकेत क्रिती सेनॉन स्पष्टपणे दिसत आहेत. पण या टीझरमध्ये रावण असो की हनुमान जी, प्रत्येकाच्या लूकमुळे लोक निराश दिसत आहेत. सोशल मीडिया यूजर्सनुसार या चित्रपटाचे VFX देखील खूप बालिश असल्याचं म्हटलं आहे.
रावणाच्या लूकवर एका यूजरने लिहिलं की, 'त्याचे केस कोणी कापले... जावेद हबीब. निर्मात्यांनी रावणाला अलाउद्दीन खिलजीसारखा बनवला आहे.'' तर एका यूजरने लिहिलं की, 'आदि पुरुषांनी प्रेक्षकांना दिलेल्या लॉलीपॉपपेक्षा ब्रह्मास्त्र खूपच छान आहे. ब्रह्मास्त्र पाहिल्यानंतर काही क्षणांत रोमांचित होतो, पण ते पाहिल्यानंतर केवळ निराशाच येतं. आम्हाला प्रभासकडून अशी अपेक्षा नव्हती.
त्याचवेळी, या 'रामायण'वर (Ramayana) आधारित हा चित्रपट काल्पनिक कथा म्हणून दाखवण्यात आल्याने एक यूजर चांगलाच संतापला आहे. त्याचबरोबर काही यूजर्सनी 'आदिपुरुष'ची तुलना 80 च्या दशकातील रामायणाशीही केली आहे. एका यूजरने लिहिले की, 30 वर्षांनंतरही जुने रामायण अॅनिमेटेड आदिपुरुषापेक्षा ताजे दिसतं.