Pathan Movie : बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (deepika padukone) पठाण चित्रपटामुळे सध्या देशभरात नवा वाद उफाळून आलाय. चित्रपटातील बेशरम रंग (besharam rang) हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हिंदुत्ववादी संघटनांसह भाजपने त्याच्यावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी आता होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे


कोलकाता येथे पार पडलेल्या 28 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना शाहरुख खानने कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शाहरुख खानच्या एका ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा सुरुय.


शाहरुख खानने ट्विटरवर #asksrk या सेशनद्वारे त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. यानंतर त्याच्या चाहत्यांची शाहरुखवर प्रश्नांचा भडीमार केलाय. किंग खाननेही आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना मजेशीर उत्तरे दिली आहेत. यावेळी शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला सर अशी कोणती कविता किंवा कोट जो ​​तुमच्या मनात वारंवार येते? असे सवाल केला. 


यावर उत्तर देताना शाहरुखने एका कवितेची ओळ लिहीली आहे. 'ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले, ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या," अशा शब्दात शाहरुखने त्याच्या चाहत्याला उत्तर दिलं आहे. दरम्यान, 'पठाण' वादाच्या भोवऱ्यात अडकला असताना शाहरुखचे हे ट्विट वाचून त्याच्या चाहत्यांनाही हुरुप आला आहे.



नेमका वाद कशासाठी?


पठाण सिनेमात "बेशरम रंग" नावाच्या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. दीपीकाने मुद्दाम भगव्या रंगाची बिकिनी घातल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकनीवरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. बेशरम गाण्याप्रमाणे दीपिकाने कपडे देखील असेच बेशरम घातले असल्याची टीका होत आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून 'पठाण' चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे.