तुम्हाला दिशा पटानी सारखी परफेक्ट फिगर बनवायची आहे का? जाणून घ्या फिटनेस फंडा
बॉलिवूडची ब्युटी क्वीन आणि स्टाईल आयकॉन अभिनेत्री दिशा पटानीचे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात
मुंबई : बॉलिवूडची ब्युटी क्वीन आणि स्टाईल आयकॉन अभिनेत्री दिशा पटानीचे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतातच. तिच्या चाहत्यांनी तिच्या प्रत्येक फोटोवर भरभरुन प्रेम केलं आहे. असाच एक खास व्हिडिओ यावेळी तिने शेअर केला आहे, हे पाहून तुम्हाला दिशा पाटणीच्या परफेक्ट बिकिनी फिगरचं रहस्य कळेल. व्हिडिओमध्ये दिशा नाजुक मुलगी दिसत नाहीये तर डॅशिंग स्टाईलमध्ये दिसत आहे. तिचा मित्र टायगर श्रॉफ देखील तिच्या या स्टाईलमवर प्रभावित झाला आहे.
दिशा पटानीने उचललं 80 किलो वजन
दिशा पटानी आपली बॉडी मेनटेन ठेवण्यासाठी जिममध्ये खूप घाम गाळते. तिच्या फिटनेसचेही लाखो चाहते आहेत, पण लोकांना माहितीच नाही की, दिशा तिच्या किलर फिगरसाठी भारी वजन उचलते. यावेळी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती 80 किलो वजन उचलताना दिसत आहे. दिशा कठोर परिश्रम घेते आणि तिच्या खांद्यावर वजन ठेवून स्क्वॅट्स करते.
आयशा श्रॉफने केलं दिशाचं कौतुक
व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओ शेअर करत दिशा पटानीने कमेंन्टमध्ये लिहिलं आहे की, '80 kg rep राजेंद्र ढोले यांचे आभार. 'टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफनेही व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंन्ट केली आहे. तिने कमेंन्टमध्ये लिहिलं आहे की, 'स्ट्रांग.' त्याचवेळी टायगरची आई आयशा श्रॉफनेही यावर कमेंन्ट केली आहे आणि लिहिलं आहे की, 'ही ती मुलगी आहे जिन्हे सुरुवातीला स्क्वाट केले होते' मेहनत... त्याचबरोबर, टायगर श्रॉफने देखील व्हिडिओवर कमेंन्ट केली आहे आणि लिहिलं की, 'नेक्स्ट लेव्हल'.
टायगरच्या कुटूंबाशी दिशा पटानीचे चांगले संबंध
टायगर श्रॉफप्रमाणे त्याची आई आयशा श्रॉफ आणि बहीण कृष्णा श्रॉफ फिटनेसची खूप काळजी घेतात. दोघंही अनेकदा आपले फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. तसंच टायगरप्रमाणेच आयशा आणि कृष्णा यांचेही दिशा पाटणीशी चांगले संबंध आहेत. बर्याचदा या सगळ्यांना एकत्र स्पॉट केले जातं
या चित्रपटात दिसणार दिशा
दिशा पटानी अखेर सलमान खान सोबत 'राधे सिनेमामध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. लवकरच दिशा आणखी बऱ्याच चित्रपटात दिसणार आहे. नुकताच दिशाने आपला वाढदिवस साजरा केला. टायगर श्रॉफने तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, जो खूप व्हायरल झाला.