दिशा पटानीने ख्रिसमसला शेअर केला बोल्ड लूक
पाहा हा बोल्ड अंदाज
मुंबई : बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री दिशा पटानीने ख्रिसमसच्या दिवशी आपल्या चाहत्यांना खूप छान गिफ्ट दिलं आहे. तिने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तिची सगळीकडेच चर्चा होत आहे.
दिशाने ख्रिसमसच्या दिवशी अगदी टू पीसमध्ये एक खूपच बोल्ड फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने चाहत्यांना ख्रिसमस विश केलं आहे.
दिशाने पहिल्यांदाच असा बोल्ड फोटो शेअर केला नाही. या अगोदर देखील ती असे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत आली आहे.
दिशाची फिगर इतकी टोन्ड आहे की तिला पाहून तुम्हाला तिच्या बॉडीची चिंता वाटेल. दिशाने या फोटोत सफेद रंगाची बिकिनी घालून फोटो शेअर केला आहे.
या फोटोखाली चाहत्यांनी अगेच आपल्या कमेंट करून प्रतिक्रिया दर्शवल्या आहेत. तिचा हा सिझलिंग लूक पाहा.
या अगोदर दिशा पटानीने 'कॅल्विन क्लीन' ब्रँडकरता फोटोशूट केलं होतं. आणि हे फोटोज तिने सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. काळ्या रंगाच्या अंडरगार्मेंटमध्ये दिशा अगदी हॉट दिसत आहे. दिशाने अनेक कॅल्विन क्लीन ब्रँडमधील फोटो शेअर केले आहे. तिच्या या फोटोतील बोल्डनेस अतिशय चांगला आहे.
बॉलिवूडमधील सर्वात क्यूट आणि हॉटनेस अशी दिशा पाटनी ही एक अभिनेत्री आहे. दिशाचं अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत नाव जोडलं गेलं. दिशा पाटनीचे इंस्टाग्रामवर 16.3 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.