Disha Patani's sister got trolled : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपट 'योद्धा' मुळे चर्चेत आहे. दिशा नेहमीच तिच्या बोल्ड फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते. मात्र, आता तिचं चर्चेत येण्याचं कारण हा तिच्या बहिणीचा व्हिडीओ आहे. तिच्या बहिणीच्या व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा पटानीच्या बहिणीचं नाव खुशबू आहे. खुशबूचा हा व्हिडीओ तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत खुशबू ही डान्स करताना दिसत आहे. मात्र, तिची ड्रेसिंग सेन्स आणि गाणं पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचं कारण म्हणजे खुशबू ही भारतीय सैन्यात असून ती ऑफिसर आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. खुशबू ही शुभ दिपच्या 'चेक' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


खुशबूचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, "ही तर खलिस्तानी निघाली." दुसरा नेटकरी म्हणाला, "फक्त व्ह्यूज मिळावे आणि लाइक्स मिळावे म्हणून शॉर्ट पॅन्ट घालायची आणि बाकी शरीर दाखवायचं आणि म्हणायचं तिला डान्स करायला आवडतं. खरंच..." तिसरा नेटकरी म्हणाला, "असं वाटतंय की ती रिटायर्ड झाली आहे." आणखी एक नेटकरी म्हणाला, "शूभला पाठिंबा देणं बंद करा... भारतीय त्यांना बॉयकॉट करत आहेत आणि तू त्याला प्रमोट करतेस... करिअर सुरु होण्या आधीच संपवलं." दुसरा म्हणाला, "देशाला विकतील पण याचं गाणं ऐकणं बंद करणार नाहीत... बरोबर ना?" तिसरा नेटकरी म्हणाला, "ती अशा व्यक्तीच्या गाण्यावर डान्स करते ज्याला पंजाब आपल्या देशापासून वेगळा व्हावा आणि स्वतंत्र देश व्हायला हवा असं म्हणतं आहे... आणि हे भारतीयान विरोधात आहे..." आणखी एक नेटकरी म्हणाला, "बूटांच्या जागी मॅडमनं पॅन्ट काढली." दुसरा नेटकरी म्हणाला "तू आर्मीत आहेस आणि याची गाणी ऐकतेस ही लाजिरवाणी गोष्ट आहे."


हेही वाचा : अनन्या पांडेच्या बहिणीनं केकचा रंग पाहून सांगितलं मुलगा होणार की मुलगी! लिंग निदान चाचणी केली? नेटकरी संतप्त


दरम्यान, या सगळ्यात तिच्या काही चाहत्यांनी तिला पाठिंबा देखील दिला आहे. तिच्या कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना डिफेंड करत म्हणाले की "ती तिच्या घरी डान्स करत आहे. गवर्मेंट कॉर्टरमध्ये नाही." दुसरा नेटकरी म्हणाला, "भाऊ, ती इंडियन आर्मीतील आहे, तिच्यात वेगळाच स्वॅग असणार ना."