मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham), दिशा पटानी (Disha Patani), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि तारा सुतारीया (Tara Sutaria) सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलर व्यतिरिक्त सध्या सोशल मीडियावर आणखी एका गोष्टीची चर्चा सुरु आहे. ते म्हणजे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले  बोल्ड सीन. दिशा आणि ताराचे चित्रपटात अनेक बोल्ड सीन आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिशाने या सीनच्या चित्रीकरणाबद्दल एक खुलासा केला आहे. जॉनसोबत हे सीन शूट करताना तिला कोणत्या अडचणी आल्या हे सांगितले. या शिवाय तिने जॉनचे आभारही मानले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशाने हा खुलासा  प्रमोशन दरम्यान देण्यात आलेल्या मुलाखतीत केला आहे. यावेळी दिशाला प्रश्न विचारण्यात आला की, एका मुलीसाठी एक सीन शूट करणं किती कठीण असतं?  या प्रश्नावर उत्तर देत दिशा म्हणाली, 'मी कुणासोबत सीन करत होते? जॉन अब्राहम. ते सीन चित्रित करणं माझ्यासाठी फारसं अवघड गेलं नाही. मी पहिल्यांदाच यांच्यासोबत असे सीन चित्रित करत होती पण जॉनने आणि मोहित सरांनी माझी खूप काळजी घेतली. त्यांनी मला कम्फर्टेबल फील करून दिलं. खरं सांगायचं तर माझी काहीच तक्रार नाहीये.' असं म्हणतं दिशाने जॉनचं कौतुक केलं आहे. 


यावेळी या कलाकारांनी रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुन म्हणाला, जर एखादी व्यक्ती अशा प्रकारे फोटो काढण्यास तयार असेल तर आपण ते स्वीकाराले पाहिजे. चला आपण फक्त गोष्टी स्वीकारायला शिकूया आणि जिथे काहीही नाही तिथे वादू घालू नका. 


दुसरीकडे, जॉनने मजेदार पद्धतीने रणबीरच्या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली. जॉन स्वत: च्या 'दोस्ताना' या चित्रपटाबद्दल बोलतं म्हणाला, त्याने एका लोकप्रिय गाण्यासाठी त्याने Bare Butt दाखवतं शूट केलं होतं. पुढे जॉन म्हणाला, “मला तुम्हाला हेही सांगायचे आहे की दोस्तानाचे बरेच एडिटेड गोष्टी माझ्याकडे अजूनही आहेत आणि त्यानंतर उपस्थित असलेले सगळेच हसू लागले. 
 
'एक व्हिलन रिटर्न्स' हा सस्पेन्सने भरलेला थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये प्रियकर कोण आणि खलनायक कोण हे समजून घेणं अवघड आहे. स्टारकास्टबद्दल बोलायचं तर या चित्रपटात चार स्टार्स पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करत आहेत. हा चित्रपट 29 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरीने केलं आहे.