मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीला बीच हॉलिडे किती आवडतात, याचा अंदाज तुम्ही तिचे बीचवरचे फोटो आणि व्हिडिओ पाहून लावू शकता. दिशा दररोज तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बिकिनी घातलेला फोटो किंवा व्हिडिओ शेअर करते आणि काही मिनिटांत तो व्हायरल होतो. अनेकदा दिशा बिकीनी लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच तिने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती गुलाबी रंगाची बिकिनी घालून समुद्रात बाथ घेताना दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ मालदीवमधला आहे. जिथे ती टायगर श्रॉफसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. याआधी दिशाने पिंक बिकिनीमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. तिची ग्लॅमरस स्टाइल पाहून चाहते तिचं भरभरुन कौतूक करत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


याआधी दिशाने लाल बिकिनीमध्ये काही फोटो शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दिशाचे हे फोटोही तिच्या मालदीव व्हेकेशनमध्ये काढण्यात आले होते. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर, दिशाने नुकताच तिचा आगामी एक्शन ड्रामा चित्रपट 'योद्धा'चं शूटिंग पूर्ण केलं आहे. ज्यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रा ​​सोबत दिसणार आहे. अलीकडेच, या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर, दिशाने चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला होता.