मुंबई: 'इनक्रेडीबल्स २' हा डिजनीचा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित झाल्यावर चांगली कमाई करत आहे. भारतातही हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. पण, मायग्रेनचा त्रास असेल आणि तुम्ही हा चित्रपट पाहू इच्छित असाल तर, काहीशी काळजी घ्या. हा चित्रपट तुमच्या आजारात भर घालू शकतो. तसेच, तुम्हाला स्पेशल लाईट इफेक्ट्सचा त्रास होत असेल तर हा चित्रपट तुमच्या त्रासाचे कारण ठरू शकतो. लहान मुलांनाही हा चित्रपट काहीसा त्रासदायक ठरू शकतो. विशेष असे की, चित्रपटातील लाईट इफेक्ट्सवरून चित्रपटाच्या सुरूवातीलाही हा इशारा दिला जात आहे.


मायग्रेन आणि मिरगीचा त्रास असणाऱ्यांना धोका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, हा चित्रपट पाहिल्यावर अनेक प्रेक्षकांनी ट्विटरवर चित्रपटातील भव्य लाईट्स इफेक्टबाब तक्रार केली. वारंवार आलेल्या तक्रारी पाहिल्यावर प्रॉडक्शन हाऊसचे लक्ष या मुद्द्याकडे गेले. सुरूवातीला वरोनिका लूईस नावाच्या एका ट्विटर यूजरने ट्विट केले. 'सावधान, नवा चित्रपट 'इनक्रेडिबल २' मध्ये अनेक ठिकाणी तीव्र लाईट इफेक्ट्स वापरण्यात आले आहेत. हे इफेक्ट्स मायग्रेन आणि मिरगीचा त्रास असणाऱ्यांना धोकादायक ठरू शकतो', असे लुईसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.





चित्रपटाच्या सुरूवातीला इशारा


दरम्यान, वरोनिका लुईस हिचे ट्विट पाहता पाहता व्हायरल झाले. अनेक लोकांनी तिला प्रतिसाद देत निर्मात्यांकडे तक्रार केली. या तक्रारी डिजनीपर्यंत पोहोचल्या तेंव्हा लाईट इफेक्ट्स बाबत चित्रपटाच्या सुरूवातीला इशारा द्यायला सुरूवात केली.