Disney Mickey Mouse : डिस्नेचे अनेक कार्टून आतापर्यंत बरीच लोकप्रियता मिळवून गेले. असे हे कार्टून सानथोर प्रत्येकासाठीच खास ठरले. काळ बदलला, पिढ्याही बदलल्या, लहान मंडळी मोठी झाली, मोठी वयोवृद्ध. पण, कार्टूनवरील आणि त्यातही डिस्नेवरील कार्टूनवर असणारं प्रेम काही कमी झालं नाही. या कार्टून्सच्या (Cartoons) गर्दीतलं एक नाव म्हणजे मिकी माऊस आणि त्याच्यासोबत दिसणारी मिनी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास 95 वर्षांपासून डिस्नेच्या सोबत असणारा हा मिकी आणि मिनी आता मात्र डिस्नेपासून दुरावणार असून, इथून पुढं डिस्नेचा त्यांच्यावर कोणताही हक्क राहणार नाही.  Steamboat Willie या 1928 मधील लघुपटामध्ये मिकी आणि मिनी पाहायला मिळाले होते. हा तोच क्षण होता जिथून डिस्नेचं नशीब खऱ्या अर्थानं फळफळलं आणि सिनेमा जगतात एक नवा अध्याय सुरु झाला. पाहता पाहता याच मिकी माऊसनं डिस्नेच्या खात्यात दर वर्षाला तब्बल 50 हजार कोटींचा गल्ला जमवून दिला. 


1928 मधील हेच मिकी आणि मिनी फक्त डिस्नेपुरताच सीमीत राहणार नसून, ते अमेरिकेतील नागरिकांना सहजपणे वापरता, नव्यानं त्यांच्या लूकवर काम करता येणार आहे. डिस्नेचा त्यांच्यावर असणारा स्वामित्वं हक्क अर्थात copyright कालावधी संपल्यामुळं आता हा मिकी आणि त्याच्यासोबत असणारी मिनी फक्त डिस्नेची नसून खऱ्या अर्थानं सर्वांचे झाले आहेत. त्यामुळं येत्या काळात कार्टूनिस्ट मिकीच्या या जुन्या आणि 95 वर्षांच्या लूकवर काम करू शकणार आहेत. किंबहुना कोणीही मिकी आणि मिनिच्या कार्टूनचा वापर अगदी मोफत करू शकणार आहेत. 


अटी कायम... 


डिस्नेकडून मिकी आणि मिनीच्या सर्वात पहिल्या वर्जनवरील कॉपीराईट सोडण्यात आले असले तरीही त्यांची आधुनिक रुपं अर्थात कार्टूनचे नवे वर्जन मात्र कॉपीराईटचा विषय राहणार असून, त्यांच्यावर फक्त डिस्नेचाच अधिकार असेल असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे. 


अमेरिकेतील स्वामित्वं हक्क कायद्यानुसार एखाद्या पात्रावर 95 वर्षांसाठी हक्क सांगता येतो. म्हणजेच Steamboat Willie 1 जानेवारी 2024 रोजी कायदेशीररित्या सार्वजनिक मालमत्ता म्हणून सर्वांसाठी उपलब्ध झाला असून आता त्यातील काम कायदेशीररित्या कोणीही सादर, शेअर, वापर करू शकतं. 


मिकी आणि मिनीसोबतच अमेरिकेतील जनतेसाठी आता चार्ली चॅप्लिन यांचा सायलेंट रोमँटिक कॉमेडी 'सर्कस', इंग्रजी पुस्तक  The House at Pooh Corner असं साहित्यसुद्धा कायदेशीररित्या उपलब्ध असेल. डिस्नेचा मिकी आता सार्वजनिकरिच्या सर्वांसाठी उपलब्ध होणं ही एक प्रतिकात्मक आणि बहुप्रतिक्षित बाब असल्याची माहिती Duke Centre for the Study of the Public Domain च्या संचालिका जेनिफर जेन्किन्स यांनी बीबीसीशी बोलताना दिली. 


हेसुद्धा वाचा : धावत्या ट्रेनमधून कर्मचाऱ्यांने रुळांवर ओतला कचरा; Viral Video पाहताच Railway म्हणते...


सोप्या शब्दांत सांगावं तर 2024 मध्ये नागरिकांना 1928 मध्ये साकारण्यात आलेली कला, साहित्य, कार्टून मोफतरित्या वापरता येणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. डिस्ने आणि जुना मिकी यांच्याच दुरावा आला असला तरीही तो कंपनीचा ट्रेडमार्क असून, corporate mascot कायम राहणार आहे. ज्यामुळं सर्वसामान्य नागरिकांसाठी त्याचा वापर मर्यादीत असेल ही बाब लक्षात घ्यावी. जेनिफर यांच्या माहितीनुसार डिस्ने ज्या उत्पादनांची विक्री करते त्या उत्पादनांची पुनर्निर्मिती करता येणार नाही. ज्यामुळं मिकी माऊसची प्रतीमा असणारी कोणतीही गोष्ट जर डिस्ने विकत असेल तर त्याची नक्कल करून त्याच पद्धतीच्या उत्पादनाची विक्री करणं अडचणीचा मुद्दा ठरू शकतं.