मुंबई : स्टार प्लसच्या ये है मोहोब्बते या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी टीव्ही जगतातील आवडती सून आहे. 


६० लाखाहून अधिक फॉलोअर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्हीजगतासोबतच दिव्यांकाचे सोशल मीडियावरही चाहते वाढतायत. दिव्यांका भारतातील पहिली अशी टीव्ही अभिनेत्री बनलीये जिचे इन्स्टाग्रामवर ६० लाखाहून अधिक फॉलोअर्स झालेत. 


दिव्यांकाने सर्व टीव्ही अभिनेत्रींना मागे टाकलंय. दिव्यांकाने इन्स्टाग्रामवर फोटो टाकत याचा आनंद व्यक्त केला. 


पाहा काय म्हणाली दिव्यांका


दिव्यांकाने थँक्यू यू नोटही पोस्ट केलीये. दिव्यांकाने फोटो शेअर करताना म्हटलंय, माझ्या या हास्यामागचे कारण आहात तुम्ही. जर इन्स्टाग्राम नसते तर मी या अजबगजब सेल्फी आणि अविस्मरणीय फोटो घेऊ शकले नसते आणि माझ्याकडे लक्षात राहण्यासारखी गोष्ट नसती. हे माध्यम नसतं तर माझ्यासारख्या लाजाळू व्यक्ती तुमच्याशी कनेक्ट होऊ शकली नसती. ६० लाख लोक माझ्या जीवनाचा भाग आहात. तुमच्या सर्वांचे आभार, असं दिव्यांकाने थँक्यू पोस्टमध्ये म्हटलंय.



 


दिव्यांका नेहमीच आपले आणि पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दिव्यांका आणि विवेक यांची भेट ये है मोहोब्बतेच्या सेटवर झाली. दोघांनी २०१६मध्ये लग्न केले.