मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सून आणि इशी माच्या नावाने ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या मृत्यूबाबत सध्या सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जातायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटवरुन तिच्या मृत्यूची अफवा व्हायरल झाली होती. या अफवेनंतर खुद्द दिव्यांकाला मी सुखरुप असून माझ्या मृत्यूची बातमी निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले.


दिव्यांकाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिच्या फॅन्सनी तिला मेसेज करण्यास सुरुवात केली होती. आपल्या मृत्यूची अफवा व्हायरल होतेय हे समजल्यानंतर तिने ट्विटवरुन सुखरुप असल्याचे चाहत्यांना सांगितले. मी सुखरुप असून माझ्या मृत्यूची बातमी केवळ अफवा आहे. माझ्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला अशा बातम्यांनी त्रास देऊ नका, असे तिने ट्विटरवर म्हटलेय.