मुंबई  : टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आजकाल रोहित शेट्टीचा शो खतरों के खिलाडीमध्ये स्टंट करताना दिसत आहे. दिव्यांका त्रिपाठीचे स्टंट लोकांना खूप आवडत आहेत. दिव्यांका त्रिपाठीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती पती विवेक दहियासोबत एक मजेदार व्हिडिओ बनवताना दिसत आहे. दोघांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच दिव्यांका त्रिपाठीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या पतीसोबत खोड्या करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री आरामात पडलेल्या विवेक दहियाला सोफ्यावरून खाली ढकलताना दिसत आहे. सर्व चाहत्यांना तिचा हा धमाल व्हिडिओ खूप आवडला आहे. दिव्यांका आणि विवेकची केमिस्ट्री पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुमच्या जागेवर कब्जा मिळवण्यासाठी अशी शक्कल लढवा.' व्हिडिओमध्ये दिव्यांका त्रिपाठी सोफ्यावर जावून झोपते आणि विवेकला हे सगळं पाहून धक्का बसला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया लग्नाआधी बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. 8 जुलै 2016 रोजी भोपाळमध्ये दोघांचं लग्न झालं. 2017मध्ये दोघांनी स्टार प्लसच्या डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये'मध्ये भाग घेतला आणि शोचे विजेते बनले. या शो दरम्यान, दिव्यांका आणि विवेकने खुलासा केला होता की, त्यांचं नातं त्यांच्या 2 चाहत्यांमुळे सुरू झालं. दोघांचे व्हिडिओ रोज सोशल मीडियावर चर्चेत असतात