लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त दिव्यांका-विवेक यांचे मालदीवमध्ये सेलिब्रेशन!
टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया ही जोडी सध्या मालदीवमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे.
मुंबई : टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया ही जोडी सध्या मालदीवमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे. दोघेही लग्नाच्या दुसऱ्या अॅनेव्हरसरीनिमित्त एकत्र सेलिब्रेशन करत आहेत. या लोकप्रिय जोडीचे काही रोमांटिक फोटोजही सोशल मीडियावरुन समोर आले आहेत.
सुमद्रकिनारी कॅंडल लाईट डिनर, फुटबॉल मॅच पाहणे अशाप्रकारे विवेक आणि दिव्यांका आपली ही ट्रिप खास करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. विवेकने इंस्टाग्रामवर काही खास फोटोज शेअर केले आहेत.
मालदिवच्या रिसॉर्टमध्ये पोहचण्यापूर्वी दिव्यांकाने एक बूमरॅंग व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ पोस्ट करत तिने लिहिले की, दोन वर्षांपूर्वी याचवेळी आम्ही आमच्या संगीत कार्यक्रमात जोरदार डान्स करत होतो. आज सगळं काही छान आहे.
लग्नाच्या दोन वर्षांनंतर दिव्यांकाच्या बिदाईचा व्हिडिओ समोर आला आहे. यात एअरपोर्टवर ती बिदाईची विधी करताना दिसत आहे. तिच्या कुटुंबातील सदस्य तिला रडण्यास सांगत आहेत.
दिव्यांका आणि विवेक यांची ओळख टीव्ही मालिका ये है मोहब्बतेंच्या सेटवर झाली. इतकंच नाही तर दिव्यांका-विवेकने 'नच बलिये-8' चा किताबही पटकावला आहे.