`माझ्या नवऱ्याची बायको` मालिकेच्या सेटवर फराळाचा बेत
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेच्या सेटवरून
मुंबई : सगळीकडेच दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण ही दिवाळी आपल्या कुटुंबासोबत किंवा जवळच्या व्यक्तीसोबत साजरा करत असतो. पण व्यस्त शेड्युलमध्ये कधी कधी हे शक्य होईलच असे नाही. कलाकारांबरोबर असं अनेकदा होतं. यावर कलाकार उत्तम तोडगा काढतात तो म्हणजे आपल्या सेटवरच म्हणजे मालिकेच्या कुटुंबासोबतच काही क्षण साजरा करतात.
झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या सेटवर दिवाळीच्या फराळाचा बेत पार पडला. दिवाळीचा मोसम असल्याने सर्वत्र फराळाचे बेत आखण्यात येत आहेत. मग याला आपले कलाकार कसे अपवाद ठरतील. असाच फराळाचा जंगी बेत प्रेक्षकांची आवडती मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'च्या सेटवर करण्यात आला. दिवाळीच्या सुट्टी नंतर शूटिंग चालू करण्याआधी या मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला आणि डाएट वगैरे विसरून करंजी, चकली, शंकरपाळे, शेव आणि त्याचबरोबरीने लाडू यांच्यावर ताव मारला.
फराळाच्या मेजवानीचा आस्वाद लुटताना 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या संपूर्ण टीमने फोटोसेशन केलं. त्यातील हा सेल्फी खास त्यांच्याचाहत्यांसाठी.
माझ्या नवऱ्याची बायकोमधील शनाया म्हणजे ईशा केसकरसोबतचा सेल्फी
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत सध्या शनाया राधिका मसालेच्या टीमला पार्टी देत आहे. या पार्टीमुळे आपण राधिकाला त्रास देऊ असं वाटतंय. पण राधिका तिचा हा डाव पाडून हाणणार आहे.