Taarak Mehta फेम जेठालालच्या पत्नी आणि मुलांविषयी ही गोष्ट तुम्हाला माहित आहे का?
दिलीप जोशींसोबत अवॉर्ड फंक्शन किंवा पार्टीमध्ये दिसतात.
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोची प्रचंड लोकप्रियता आहे. लोकांना हा शो इतका आवडतो की, दर आठवड्याला ते टीआरपीच्या शर्यतीत सामील होतात. या शोमध्ये जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आज घराघरात पोहोचले आहेत.
दिलीप जोशी यांच्या रिअल लाईफ पार्टनरचे नाव जयमाला जोशी आहे. सौंदर्याच्या बाबतीतही ती कुणापेक्षा कमी नाही पण मीडियाच्या लाईम लाईटपासून त्या नेहमीच दूर राहतात.
छोट्या पडद्यावर दिलीप जोशींची चलती आहे, पण त्यांच्या घरात फक्त जयमाला यांचा राज चालतो. जयमाला या गृहिणी असून त्या आपल्या घराची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेते.
मीडियाच्या लाइमलाइटपासून दूर असलेल्या जयमाला अनेकदा दिलीप जोशींसोबत अवॉर्ड फंक्शन किंवा पार्टीमध्ये दिसतात.
जयमाला आणि दिलीप जोशी यांच्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत. त्यांना दोन मुले, एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांची नावे नियती जोशी आणि ऋत्विक जोशी आहेत.