मुंबई : बॉलिवूड बादशाहा शाहरुख खान हा कोट्याधीश आहे. बंगला, गाड्या अशी अनेक भौतिक सुखं जोडून हात जोडून उभी आहेत. मात्र दिल्लीहून मुंबईत आपले करिअर घडवायला आलेल्या शाहरुखची परिस्थिती बिकट होती. खिशात केवळ ३०० रुपये होते. राहायला घर देखील नव्हते. मात्र आता तो 'मन्नत' नावाच्या बंगल्यात राहतो.


शाहरुखप्रमाणे त्याचा बंगला देखील प्रसिद्ध आहे. हा बंगला शाहरुखने १९९५ साली विकत घेतला. त्यावेळी त्याची किंमत होती १५ कोटी. मात्र आता त्याची किंमत ऐकून तुम्ही चाट पडाल. कारण थोडीथोडकी नव्हे तर या बंगल्याची किंमत आहे तब्बल २०० कोटी. बेडरूम, लिविंग एरिया, जीम, खासगी बार, लायब्ररी, मुलांसाठी प्लेरूम असे मिळून ६००० चौरस फुटांचा हा बंगला आहे.