मुंबई : 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा आपल्या कथेने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 2 दिवस झाले आहेत. मात्र या चित्रपटाची क्रेझ सातत्याने वाढत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारे अभिनेते अनुपम खेर यांनी या चित्रपटाच्या पडद्यामागील एक व्हिडिओ शेअर केला आहे.


अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताच हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर यांना ओळखणे प्रेक्षकांसाठी खूप अवघड होते आहे. 


कारण यावेळी त्यांनी भोलेनाथ यांचा रंग चेहऱ्यावर लावला आहे.


अनुपम खेर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. हा व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी पडद्यामागे काय घडते हे दाखवले आहे. 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा सध्या खूपच चर्चेत आहे. अनेक वादांमुळे देखील हा सिनेमा सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे.