This Actor did Actress Body Double Role : चित्रपटसृष्टीत प्रत्येक व्यक्ती येताना त्याचं स्वप्न घेऊन येतो. त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी त्याच्या अगोदर येणारी सगळी छोटी-मोठी कामं करत राहतो. त्याचं कारण हे असतं की त्या व्यक्तीला स्वत: वर असलेला विश्वास की एकदिवस ते नक्कीच काही तरी करणार. असंच काही तरी एका अभिनेत्यासोबक झालं. या अभिनेत्यानं करिअरच्या सुरुवातीला बॉडी डबल म्हणून काम केलं. पाहता पाहता त्यांना बॉलिवूडचे जंपिंग जॅक अशी ओळख मिळाली. आता हा अभिनेता कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो दुसरा कोणी नसून रवी कुमार आहेत. 


कोण आहे रवी कुमार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी कुमार ज्यांना आपण सगळे जिंतेंद्र या नावनं ओळखतो. जितेंद्र यांनी खूप खालच्या पातळीवरून करिअरची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी तर अभिनेत्रींचे बॉडी डबल म्हणजेच महिला होऊन काम केलं. मात्र, त्यांनी नंतर एकाहून एक असे चित्रपट देखील दिले आणि स्टार झाले. चला जाणून घेऊया जितेंद्र यांच्या संघर्षाची कहाणी...


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


जितेंद्र यांच्या वडिलांचा मुंबईत ज्वैलरी बिझनेस सुरु केला. रिपोर्ट्सनुसार, त्यांची ज्वैलरी ही इंडस्ट्रीला सप्लाय करण्यात येत होती. तर त्यांचं शिक्षणही हे मुंबईत झालं होतं. कॉलेजच्या काळात जितेंद्र आणि राजेश खन्ना हे क्लासमेट होते. जितेंद्र यांना सुरुवातीपासून अभिनयाची आवड होती आणि जेव्हा-केव्हा ते दागिने देण्यासाठी जायचे तेव्हा त्या कलाकारांना पाहून त्यांना अभिनय करण्याची आवड आणखी वाढायची. जितेंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की ते जितेंद्र व्ही. शांताराम यांचे चाहते होते आणि त्यांना एकदा भेटण्याची त्यांची इच्छा होती. पण कोणी त्यांना भेटू द्यायचं नाही. ते नेहमी आर्टिफिशियल ज्वेलरी घेऊन जायाचं तर त्यांच्याकडून ते दागिने घेऊन त्यांना लगेच पाठवले जायचे. 


जितेंद्र यांना कळलं की व्ही. शांताराम यांच्या सेहरा या चित्रपटासाठी ऑडिशन सुरु आहेत. त्यांनी त्यांचे मित्र राजेश खन्नाकडून ऑडिशन देण्यासाठीची ट्रेनिंग घेतली, कारण जितेंद्र यांनी कधीच अभिनय केला नव्हता. तर त्यावेळी राजेश खन्ना हे स्वत: थिएटर करायचे. ट्रेनिंग घेतल्यानंतर जेव्हा त्यांची एन्ट्री व्ही.शांतारामच्या स्टूडियोमध्ये झाली तेव्हा त्यांना कळलं की तिथे अभिनेत्रीच्या बॉडी डबलची शूटिंग सुरु आहे आणि त्यांना पाहिजे तसेच जितेंद्र आहेत. याविषयी जितेंद्र यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये खुलासा केला होता. तर त्यावेळी जितेंद्र यांनी संध्या शांताराम यांच्या बॉडी डबलचं काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी काही चित्रपटांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं. त्यानंतर अखेर एक दिवस आला जेव्हा जितेंद्र यांना व्ही. शांताराम यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि इतकंच नाही तर त्यांना एका चित्रपटाची ऑफर देखील दिली. अशात जितेंद्र यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच होती. त्यांनी स्क्रिप्ट न वाचता किंवा कोणती भूमिका आहे हा विचार न करता होकारण दिला. 


हेही वाचा : बीफ खाणं चुकीचं नाही', जुन्या ट्वीटवरून सुरु झालेल्या वादावर कंगना रणौतची प्रतिक्रिया; स्पष्टीकरण देत म्हणाली...


व्ही शांताराम यांनी रवी कपूरचं नाव जितेंद्र ठेवलं आणि स्क्रीनवर त्यांना जितेंद्र या नावानं इंट्रोड्यूस केलं. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या गीत गाया पत्थरो या चित्रपटातून ते सुपरहिट झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि एकामागे -एक सुपरहिट चित्रपट दिले.