मुंबई : अभिनेत्री रेखा यांच्या सोबत दिसणारा हा लहान मुलगा कोण आहे याबाबत अनेकांना माहिती नाही. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेखा यांच्याजवळ बसलेला हा मुलगा अभिनेता आहे. ज्याची ओळख आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहब्बतें फेम हिरो जुगल हंसराज आठवत असेल. ज्याने आपल्या निळ्या डोळ्यांनी मुलींना वेड लावले. जुगल हंसराज याने खूपच कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याच्या चॉकलेटी बॉय इमेजने त्याने मुलींच्या हृदयात निश्चितच स्थान निर्माण केले. जुगल हंसराजचा बालपणीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखाच्या मांडीवर बसलेला तो दिसत आहे. या फोटोमध्ये जुगल हंसराज खूपच लहान आणि क्यूट दिसत आहे.


जुगल हंसराज याने लहानपणापासून अभिनयाला सुरुवात केली. अनेक चित्रपटांमध्ये तो बालकलाकार म्हणून दिसला आहे. आजकाल जुगल हंसराज चित्रपटांपासून पूर्णपणे गायब आहे आणि आपल्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक आहे. जुगल पत्नी जास्मिन आणि मुलासोबत अमेरिकेत राहतो. 


2014 मध्ये त्याने गर्लफ्रेंड जास्मिन ढिल्लनशी लग्न केल्यानंतर, जुगल कायमचा अमेरिकेला गेला. जुगल आता चित्रपटांमध्ये सक्रिय नसला तरी तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. त्याचा लूकही आता पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे.


जुगल हंसराजने बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. मासूम आणि कर्मा यांसारख्या चित्रपटांमध्ये तो दिसला आहे.