मुंबई : बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असायच्या. आता रेखा रुपेरी पडद्यापासून दूर आहेत, पण रोज त्यांच्याबद्दल चर्चा रंगत असतात. रेखा आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाचे अनेक किस्से प्रत्येकाला माहिती आहेत. बिग बींनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल काही केलं नाही. पण रेखा यांनी अनेकदा प्रेमाची कबुली दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत रेखा यांना बिग बीं संदर्भात अनेक प्रश्न विचारले. रेखा यांना विचारण्यात आलं 'तुम्ही कधी अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम केलं आहे का?' यावर रेखा यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. 



प्रश्नाचं उत्तर देत त्या म्हणाल्या, 'आजपर्यंत मी असा एकही व्यक्ती पाहिला नाही जो बिग बींवर प्रेम करत नाही... महिला, लहान मुलं सगळे त्यांच्यावर प्रेम करतात. असं असताना मला असं वेगळ का ठेवलं जातं? मला त्यांच्यावर प्रेम आहे...'


एवढंच नाही तर माझं अमिताभ यांच्यासोबत कोणतही खासगी नातं नव्हतं असं देखील रेखा म्हणाल्या. मुलाखीत त्यांनी जया बच्चन यांच्याबाबत देखील अनेक गोष्टी सांगितल्या. 


जया बच्चन यांच्याबाबत बोलताना रेखा म्हणाल्या, 'जया आणि माझ्यात काही वाद नाहीत... आधी आम्ही दोघी एका बिल्डिंगमध्ये राहत होतो... आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत.. माझ्यासाठी त्या बहिणीच्या जागेवर आहेत...'


रेखा पुढे म्हणाल्या, 'मी देवाचे आभार मानेल... त्यांच्या मनात देखील अशीचं भावना आहे... आम्ही दोघी जेव्हा भेटतो तेव्हा आमच्या अनेक गोष्टींवर गप्पा होतात....'