मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक ड्रेंण्ड चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या ट्रेंण्डमध्ये बॉलिवूड कलाकारांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि चाहत्यांना या सेलिब्रिटींना ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं. यातच आता एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या अभिनेत्याला ओळखण्याचं चॅलेंज चाहत्यांना दिलं जात आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना या अभिनेत्याला ओळखणं कठिण झालं आहे तर अनेकांनी मात्र या अभिनेत्याला बरोबर ओळखलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्हीही जर या अभिनेत्याला ओळखलं नसेलं तर अजून डोकं चालवण्याची काही गरज नाही कारण आता आम्ही तुम्हला सांगणार आहोत की हा अभिनेता नक्की आहे कोण. तर हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन आहेत. बीग बींच्या लहानपणीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ब्लॅक एण्ड व्हाईट हा फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत बीग बी अगदी सोज्वळ अंदाजात दिसत आहेत. हा फोटो पिंकविलाच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत ओळखा पाहू असं कॅप्शनही या फोटोला देण्यात आलं आहे.


अनेकांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं आहे की, श्री अमिताभ जी तर अजून एकाने लिहीलंय की, याचं उत्तर मी KBC मध्ये जाऊन देणार ईथे फ्रिमध्ये का देऊ? तर अजून एकाने लिहीलंय, जहा ये खडे हो जाते है. लाईन वहीसे शुरु हो जाती है. तर अजून एकाने लिहीलं आहे की, द वन एण्ड ओनली अमिताभ जी. तर अजून एकाने लिहीलंय, यांना कोण नाही ओळखत वन एण्ड ओनली बीग बी. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते या फोटोवर करत आहेत.



अमिताभ बच्चन सिर्फ नाम ही काफी है! बी ग बींचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. या अभिनेत्याचा चाहता वर्ग प्रत्येक वर्गात आपल्याला पहायला मिळतो. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन नेहमीच सक्रिय असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीत काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. त्यांनी एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल होवू लागते. बीग बी कायमच त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतात. सध्या बीग बी KBC 17 सीझन होस्ट करत आहेत. या शोमध्ये ते त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासे करताना दिसतात.