मुंबई : बॉलिवूडमधील स्टार्सच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी लोकांना फार उत्सुक्त असते. त्यात ऐश्वर्या राय बच्चन अनेक लोकांच्या मनात घर केलं आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकणारी ऐश्वर्या सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. वयाच्या 48 व्या वर्षीही स्वत:ला फिट आणि मेंटेन ठेवणाऱ्या या अभिनेत्रीचे काही फोटो सध्या खूप चर्चेत आहेत. यामागचे कारणही तसंच आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमुळे ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसत आहे. पण या फोटोंमध्ये ऐश्वर्याला पाहून लोक ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत.


viralbhayani ने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून काही फोटो शेअर केले आहेत. ऐश्वर्या आर सरथ कुमारच्या कुटुंबासोबत दिसत आहे. या फोटोंमध्ये ऐश्वर्याचा लूक लोकांना फार आवडला आहे. परंतु या सगळ्या फोटोंमध्ये ऐश्वर्या आपलं पोट लपवताना दिसत आहे. तिने तिचं पोट लवण्यासाठी आपला हात मध्ये आणला. तर काही फोटोमध्ये ती लोकांच्यापाठी जाऊन लपली आहे. जेणे करुन तिचे पोट दिसू नये.



परंतु लोकांना जो अंदाज बांधायचा आहे, तो त्यांनी बांधलाच आणि सोशल मीडियावर प्रश्न उपस्थीत करण्यास सुरूवात केली की, ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे का? आता या चर्चांनी भलताच जोर धरला आहे.


खरातर हा फोटो काही महिन्यांपूर्वीचा आहे. परंतु आता बॉलिवूड अभिनेत्रींच्या आई होण्याच्या आणि प्रेग्नेंसीच्या बातम्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.


खरेतर लोकांचे असे म्हणणे आहे की, तुम्ही जर ऐश्वर्या राय बच्चनचा इंस्टाग्रामचा अकाउंट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, अभिनेत्री तिच्या सगळ्याच फोटोंमध्ये आपलं पोट कसं झाकलं जाईल याची काळजी घेत आहे. त्यामुळे तिची प्रेग्नेंट असल्याची शक्यता अजूनही नाकारता येत नाही


परंतु आत्तापर्यंत ऐश्वर्या किंवा तिच्या कुटुंबियांच्या वतीने याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या बातम्या फक्त अफवा असल्याची शक्यता नाकारता येत नाही.