'Baipan Bhari Deva 2': 'बाईपण भारी देवा' या चित्रपटानं या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतो आहे. आतापर्यंत या चित्रपटानं 70 कोटी कमावले असून हा चित्रपट यावर्षीचा बॉक्स ऑफिसवरील सर्वात हीट चित्रपट ठरला आहे. 'सैराट' आणि 'वेड'नंतर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली असून त्यानंतर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. सध्या अशाच एका चित्रपटाची चर्चा रंगलेली असून आता केदार शिंदे यांच्या पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता 'बाईपण भारी देवा 2' येणार आहे का याची चुणूक या त्यांच्या पोस्टवरून सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी नेटकऱ्यांनीही यावेळी जोरदार प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. नक्की काय लिहिलंय त्यांनी या पोस्टमध्ये? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहा बहिणींच्या या आगळ्यावेगळ्या कहाणीनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. हा चित्रपट घरोघरी अगदी कानाकोपाऱ्यात पोहचला आहे. त्यामुळे याची पुढची कहाणी आली तर प्रेक्षकांना नक्कीच पाहायला आवडेल. परंतु ती कधी येणार याकडे तर प्रेक्षकांचे अगदी लक्ष लागून राहिले आहे त्यामुळे त्यांची चर्चा रंगलेली आहे याचं निमित्त आहे ते म्हणजे केदार शिंदे यांची पोस्ट. यावेळी त्यांनी काल एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात केदार शिंदे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी एक कॅप्शन लिहिलं आहे. ज्यातील दोन वाक्यांमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी ते तिघंही हॉटेलमध्ये बसलेले दिसत आहेत. त्यांनी एक मस्त स्माईल करत सेल्फी शेअर केलेला दिसतो आहे. 


हेही वाचा - '...त्यामुळे मला लग्नात रस नाही'; मातृत्त्वावरून ट्रोल होणाऱ्या कल्कीचं सडतोड उत्तर


सध्या केदार शिंदे यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''एक कहानी खतम तो दुजी शुरु हो गयी मामू... बाईपण भारी देवा नंतर... काहीतरी भारी...'' त्याचसोबत #बाईपणभारीदेवा #somethingnew #whatscooking असे टॅग्सही टाकले आहेत. ओमकार मंगेश यांनी स्वत: ला टॅग केलं आहे आणि सोबतच त्यांनी केदार शिंदे आणि 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या लेखिका वैशाली नाईक यांनाही टॅग केलं आहे. 



सध्या त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अनेकजण म्हणतायत की, ''आता 'बाईपण भारी देवा'चा पुढचा भाग येणार का?'' तर अनेकांनी कमेंट केली आहे की, ''आम्ही खूप उत्सुक आहोत.'' तर काहींनी म्हटलं की 'जत्रा 2' येतोय का?